आवर्जून पाहाव्यात अशा सामाजिक घटनांवर आधारित या टॉप 5 वेबसिरीज
ओटीटी प्लॅटफॉर्मवर नानाविध प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे. अगदी ‘कॉमेडी’ पासून ‘हॉरर’ पर्यंत सर्व प्रकारच्या एकापेक्षा एक वेबसिरीज इथे उपलब्ध आहेत. याचबरोबर काही महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर आधारित वेबसिरीजही उपलब्ध आहेत. यातील काही वेबसिरीज सत्यघटनेवर आधारित आहेत. यामध्ये समाजात घडलेल्या विविध घटना, गुन्हेगारी आणि भ्रष्ट्राचाराचं चित्रण बघायला मिळतं. अशाच टॉप 5 वेबसिरीजविषयी – (Top 5 Web Series based on Social issues)
१. स्कॅम ९२
स्कॅम ९२ ही वेबसिरीज १९९२ साली झालेल्या शेअरबाजार घोटाळ्यावर आधारित आहे. त्यावेळी हा घोटाळा उघड झाल्यावर ‘बिग बुल’ हर्षद मेहताला अटक करण्यात आली आणि शेअर बाजार कोसळला. यामुळे कित्येक लोक रस्त्यावर आले.
हर्षद मेहता प्रकरणातील अनेक गोष्टी लोकांसमोर आल्या नव्हत्या. या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहतांच्या आयुष्याचं यथासांग चित्रण करण्यात आलं आहे. यामध्ये [प्रतीक गांधी हर्षद मेहतांच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत सिरीजमध्ये श्रेया धन्वंतरी, चिराग वोहरा, अंजली बारोट, हेमंत खेर, निखिल द्विवेदी, शादाब खान, कविन दवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज सोनी LIV वर उपलब्ध असून, IMDB वर या सीरिजला ९.३ रेटिंग देण्यात आलं आहे.
२. मुंबई डायरीज
मुबई डायरीज ही वेबसिरीज २६/११ च्या मुंबई अटॅकवर आधारित आहे. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये अडकलेले लोक, त्यांची मानसिकता, हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, मृतांचे वाढत जाणारे आकडे, इ साऱ्या गोष्टींचं चित्रण करण्यात आलं आहे.
सिरीजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, प्रकाश बेलवाडी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही सिरीज अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत. IMDB वर या सीरिजला ८.९ रेटिंग देण्यात आलं आहे. (Top 5 Web Series based on Social issues)
====
हे देखील वाचा – जेव्हा निर्माते स्वतः विचारतात ‘पिक्चर कैसी हैं….?’
====
३. दिल्ली क्राईम
दिल्ली क्राइम ही वेबसिरीज २०१२ साली दिल्लीमधील मुनिरका परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित आहे पोलिस उपायुक्त (डीसीपी) वर्तिका चतुर्वेदीवर पीडित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात येते. या गुन्ह्याच्या तपासाच संपूर्ण प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे.
या सिरीजमध्ये शेफाली शहा, रसिका दुग्गल, आकाश दहिया, आदिल हुसेन, कुमार विजय, राजेश तैलंग प्रमुख भूमिकेत असून सिरीज ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे. या सीरिजला IMDB वर ८.५ रेटिंग मिळाले आहे. (Top 5 Web Series based on Social issues)
४. काफिर
भारत – पाकिस्तानच्या वादामध्ये दोन्हीकडच्या सीमेवरच्या गावांमधली सर्वसामान्य जनता अनेकदा भरडली जाते. काफिरची कहाणी अशाच एका सामान्य मुलीची कहाणी आहे जिला गैरसमजुतीतून आतंकवादी ठरवलं जातं.
ही कहाणी ‘कैनाज’ नावाच्या एका पाकिस्तानी मुलीची कहाणी आहे जी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून पळून जाते. परंतु चुकून ती सीमा ओलांडून भारतात प्रवेश करते. इथे भारतीय सैनिक तिला आतंकवादी समजून पकडतात आणि कैद करतात. कैदेमध्ये असतानाच ती एका मुलीला जन्म देते. अखेर कैनाजला पत्रकार आणि वकील वेदांत राठोड मदत करतात.
ही सिरीज सत्यघटनेवर आधारित असून या सिरीजमध्ये दीया मिर्झा आणि मोहित रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज ‘झी 5’ वर उपलब्ध असून IMDB वर या सीरिजला ८.२ रेटिंग देण्यात आलं आहे.
५. इनसाइड एज
क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ. इनसाइड एज ही कथा आहे पॉवरप्ले लीगमध्ये खळणाऱ्या T20 क्रिकेट फ्रँचायझी मुंबई मॅव्हरिक्सची. पैसा आहे तर पॉवर आहे. प्रत्येक माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात स्वार्थ असतोच. परंतु परोकोटीचा स्वार्थ गुन्ह्यांना आमंत्रण देतो. ही सिरीज क्रिकेट, स्वार्थ, सेक्स, पैसा, पॉवर, मॅच फिक्सिंग या साऱ्याभोवती फिरते. (Top 5 Web Series based on Social issues)
या सिरीजचं कथानक काल्पनिक असलं तरी यामध्ये काही खऱ्या घटनांचा आधार घेण्यात आला आहे. सिरीजमध्ये विवेक ओबेरॉय, रिचा चड्ढा, तनुज विरानी, सिद्धांत चतुर्वेदी इ. कलाकार प्रमुख भूमिकेत असून, ही सिरीज अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. IMDB वर या सीरिजला ८ रेटिंग देण्यात आलं असून. सीरिजचे एकूण ३ सिझन प्रदर्शित झाले आहेत.