‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Tripti Dimri ने स्पिरिटमध्ये दीपिका रिप्लेस करुनही तिच्या समर्थनाथ केली ‘ही’ पोस्ट!
जुन्या अभिनेत्रीला नवख्या अभिनेत्रीने रिप्लेस करणं काही नवं नाही… असंच काहीसं झालं आहे दीपिका पादूकोण हिच्याबद्दल… स्पिरीट आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिचा पत्ता कट झाल्यानंतर आता तिच्या जागी Animal चित्रपट फेम तृप्ती डिमरी हिने स्पिरीटमध्ये तिची जागा घेतली आहे… संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटावेळी दीपिकाने केलेल्या मागण्या अमान्य झाल्यामुळे दोघांमधील मतभेदामुळे दीपिका साऊथच्या चित्रपटातून बाहेर गेली… आणि तिच्याजागी प्रभाससोबत आता तृप्ती डिमरी (Tripti Dimri) झळकणार आहे… तृप्तीने मात्र आता Deepika Padukone ची बाजू घेतली आहे… नेमका काय आहे मुद्दा जाणून घेऊयात…

तर, दीपिका पादूकोण हिने ८ तास शिफ्ट असावी हा अट्टहास केला होता, पण तिच्या या अट्टहासापायी तिला दोन चित्रपटांतून हात धुवावा लागला… एकीकडे तिच्या मागण्या योग्य आहेत असं काही जण म्हणत असताना दुसरीकडे तिची निगेटिव्ह पब्लिसिटी देखील केली जात आहे… याच मुद्दायवरुन तृप्ती डिमरीने दीपिका पादुकोणची बाजू घेतली आहे… तिने केलेल्या मागण्या योग्य असून तिच्याबद्दल चुकीचं नरेटिव्ह सेट करणं गैर असल्याचं मत देखील तृप्तीने व्यक्त केलं होतं… (Entertainment News)

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता… या व्हिडिओमध्ये सेलिब्रिटी साडी ड्रेपर डॉली जैन सांगत आहेत की, “दीपिकाने ‘गोलियों की रासलीला राम लीला’ चित्रपटातील ‘नगाडा संग ढोल बाजे’ गाण्यावर अनवाणी नृत्य केलं होतं… त्यावेळी तिच्या पायांतून रक्त येत होतं, पाय सुजले होते.. ३० किलोंचा लेहेंगा घालूनही तिने दमदार नृत्य केलं होतं..”. दरम्यान, तृप्तीने याच व्हिडीओवर आपलं मंत मांडतं असं म्हटलं होतं की, “दीपिका पादुकोण कधीही ‘अनप्रोफेशनल’ असू शकत नाही, जसे लोक तिला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत”. (Deepika Padukone News)

================================
हे देखील वाचा : Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
=================================
संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy vanga) यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर दीपिका आणि वांगा यांचं हे पहिलंच कोलॅबरेशन असणार होतं… मात्र, दिग्दर्शक आणि अभिनेत्रीत मतभेद झाले आणि दीपिकाचा पत्ता कट होऊन तृप्ती डिमरीने तिची जागा घेतली… ‘स्पिरिट’ व्यतिरिक्त तृप्ती अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोबत ‘माँ बहन’ चित्रपटातही दिसणार आहे… त्यामुळे आता दीपिकानंतर तृप्ती अजून कोणकोणत्या अभिनेत्रींना रिप्लेस करणार हे येत्या काळात पाहावं लागेल… (Tripti Dimri movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi