महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
Ulajh Box Office Collection: जान्हवी कपूरचा ‘उलझ’ नाही पसरवू शकला जादू; आतापर्यंत कमावला केवळ ‘एवढाच’ गल्ला
अजय देवगणचा ‘औरों में कहां दम था’ आणि जान्हवी कपूरचा ‘उलझ‘ हे चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये एकमेकांसमोर आले. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हे दोन्ही चित्रपटकाही खास कमाई करताना दिसत नाही आहेत. जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा झाली होती, मात्र चित्रपटगृहात धडक दिल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाची विकेट पडली आणि वीकेंडला हा चित्रपट कमाल दाखवू शकलेला नाही. येथे जाणून घेऊया रिलीज झाल्यानंतर आतपर्यंत या ‘उलझ’ने किती कोटींची कमाई केली आहे.(Ulajh Box Office Collection)
‘उलझ’ने रविवारी तिसऱ्या दिवशी दोन कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.१५ कोटींची कमाई करत संथ सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1.75 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘उलझ’ने एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ४.९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.जान्हवी कपूरचे दोन सिनेमे या वर्षी आतापर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या अभिनेत्रीने ‘उलझ‘ या चित्रपटाद्वारे चित्रपटगृहात धडक दिली आहे.
या चित्रपटात जान्हवी एका आयएफएस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा चित्रपट खास कमाल करू शकला नाही कारन प्रदर्शनपूर्वी जेवढी या सिनेमाची चर्चा होती त्यानुसार प्रेक्षकांना सिनेमाकडून खुप अपेक्षा होत्या मात्र मोठ्या त्या पूर्ण होताना काही दिसल्या नाही. त्यामुळे जान्हवी कपूरच्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. वीकेंडला हा चित्रपट चांगला बिझनेस करेल, अशी निर्मात्यांना आशा होती, पण शनिवार आणि रविवारीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसला नाही.(Ulajh Box Office Collection)
==============================
=============================
जान्हवी कपूरच्या ‘उलझ‘ हा सिनेमा प्रेक्षकांना तितकासा समजलेले दिसत नाही. ज्यामुळे पहिल्या दिवसापासूनच सिनेमागृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या मानत जागा बनवू शकला नाही. शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत किंचित वाढ झाली असली तरी हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे व्यवसाय करू शकलेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून या चित्रपटाने आतापर्यंत पाच कोटी रुपयेही कमावलेले नाहीत. ज्या वेगाने हा चित्रपट पुढे सरकत आहे, ते पाहता लवकरच ‘उलझ‘ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकणार नाही असेच दिसत आहे.