Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला

‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“माझं मराठी बेळगावकडचं…”, रजनीकांत सरांचा साधेपणा पाहून भारावले Upendra Limaye

Marathi Movies 2025 : ३ मराठी चित्रपट येणार आमने-सामने!

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

…तर अक्षयकुमार ठरला असता खरा बाजीगर

 …तर अक्षयकुमार ठरला असता खरा बाजीगर
कहानी पुरी फिल्मी है

…तर अक्षयकुमार ठरला असता खरा बाजीगर

by मानसी जोशी 30/05/2022

हा चित्रपट शाहरुखच्या कारकिर्दीमधला टर्निंग पॉईंट ठरला होता…या चित्रपटाने काजोलला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली होती…या चित्रपटामधून फिटनेस ब्युटीची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती…आमिर खानच्या ‘अवॉर्ड शो’ला न जाण्यामागे काही अंशी हाच चित्रपट कारणीभूत होता…या चित्रपटात  शाहरुख -काजोल प्रथमच एकत्र आले होते… हो… बरोबर…. हा चित्रपट होता बाजीगर!

नकारात्मक भूमिकेतला नायक ही काहीशी ‘आउट ऑफ द बॉक्स’ वाटणारी संकल्पना या चित्रपटात दाखवण्यात आली होती. शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी या तिन्ही चेहऱ्यांना तेव्हा ‘स्टारडम’ नव्हतं. शिल्पा शेट्टीचा हा पहिलाच आणि काजोलच्या पहिल्या फ्लॉप चित्रपटानंतरचा दुसरा चित्रपट होता, तर शाहरुख तेव्हा इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता. 

चित्रपटाची कहाणी तशी अगदीच नवीन नव्हती, पण क्लायमॅक्स आणि मांडणी मात्र एकदम ‘हटके’ पद्धतीने करण्यात आली होती. श्रीमंत कुटुंबातील दोन बहिणी प्रिया आणि सीमा. त्यांच्यावर प्रेम करणारा नायक अजय शर्मा उर्फ विकी मल्होत्रा. सीमा उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करते. पण प्रियाला मात्र ही गोष्ट पटत नाही कारण सीमाला उंचावरून खाली बघायची भीती वाटत असते, त्यामुळे आत्महत्याच करायची असती, तर तिने दुसरा पर्याय शोधला असता

प्रिया ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, या विचारावर ठाम असते. पण तिचे वडील तिला साथ देत नाहीत. पण एक व्यक्ती यामध्ये तिला साथ देते; ती व्यक्ती म्हणजे तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिचा मित्र इन्स्पेक्टर करण. चित्रपटात सिद्धार्थच्या एकतर्फी प्रेमाची हळवी बाजूही दाखववण्यात आली होती. पुढे काय होतं, हे सांगितलं तर तो स्पॉईलर ठरेल. चित्रपट जुना असो किंवा नवा  त्याबद्दल लिहिताना स्पॉईलर नसावाच. 

Unknown facts about Baazigar

‘बाजीगर’मध्ये रोमान्स, सस्पेन्स, ड्रामा, मिस्ट्री सारं काही होतं आणि सोबतीला सुमधुर गाणी. म्हणूनच नायकाची नकारात्मक भूमिका असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा जितकी मसालेदार आहे तितकेच चित्रपटाच्या मेकिंगचे किस्सेही भन्नाट आहेत. त्याबद्दलच थोडंसं (Unknown facts about Baazigar) –

अनेकांनी नाकारलेली भूमिका शाहरुखने स्वीकारली

डर प्रमाणेच बाजीगर मधल्या शाहरुखच्या भूमिकेसाठी आधी अनेक नायकांना विचारणा करण्यात आली होती. दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी आपल्या आधीच्या चित्रपटाचा (खिलाडी) हिरो अक्षयकुमारला या भूमिकेसाठी विचारलं होतं शाहरुख खानची भूमिका आधी अक्षयकुमारला ऑफर करण्यात आली होती. परंतु नकारात्मक भूमिका असल्यामुळे त्याने ही भूमिका नाकारली. 

पुढे अनिल कपूर व सलमान खाननेही याच कारणांसाठी ही भूमिका नाकारली. यानंतर अजय देवगण व अरमान कोहलीच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. त्यांनीही ही भूमिका नाकारल्यावर अखेर ही भूमिका शाहरुखला मिळाली आणि या भूमिकेने शाहरुखला केवळ लोकप्रियताच नाही, तर आयुष्यातलं पहिलं फिल्मफेअर अवॉर्डही मिळवून दिलं. (Unknown facts about Baazigar)

Akshay Kumar Wiki, Age, Height, Wife, Girlfriend, Children, Family &  Biography – WikiBio

वयाने अगदीच लहान होत्या काजोल आणि शिल्पा 

चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काजोल १८ वर्षांची, तर शिल्पा शेट्टी अवघ्या १७ वर्षांची होती. 

सिद्धार्थ रे होता दुसरी पसंती 

चित्रपटामध्ये प्रियावर एकतर्फी प्रेम करणारा तिचा मित्र करणची भूमिका आधी आदित्य पांचोलीला ऑफर करण्यात आली होती. परंतु नकार दिल्यामुळे यामध्ये सिद्धार्थ रे ची वर्णी लागली. 

हॉलिवूडच्या कादंबरीवर आधारित हॉलिवूड पटाचा ‘अनऑफिशिअल’ रिमेक 

बाजीगर हा चित्रपट १९९१ साली आलेला हॉलिवूड चित्रपट ‘अ किस बिफोर डायिंग’ या चित्रपटाचा ‘अनऑफिशिअल’  रिमेक आहे. ‘अ किस बिफोर डायिंग’ हा चित्रपट याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. परंतु मूळ कथेत काही बदल करण्यात आल्यामुळे हा ‘अनऑफिशिअल’ रिमेक समजला जातो.  (Unknown facts about Baazigar)

काजोलही नव्हती पहिली पसंती 

बाजीगर मधील प्रिया चोप्राच्या भूमिकेसाठी आधी श्रीदेवीच्या नावाचा विचार करण्यात आला होता. तसंच दिग्दर्शक अब्बास – मस्तान यांनी यामध्ये श्रीदेवीचा डबल रोल दाखवायचा विचार केला होता मात्र नंतर मात्र त्यांनी हा विचार बदलला. एका प्रसिद्ध नायिकेची नायकाने केलेली हत्या कदाचित प्रेक्षकांना पटणार नाही हा विचार करून त्यांनी यामध्ये नवीन नायिका घ्यायचं ठरवलं. त्याच दरम्यान दिग्दर्शक अब्बास- मस्तान काजोलचा बेखुदी त्यांनी पहिला आणि त्यांनी लगेच तिची निवड केली.  

Unknown facts about Baazigar

काजोल सोबत दिसली असती जुही चावला 

चित्रपटातील सीमाच्या भूमिकेसाठी आधी जुही चावलाला विचारण्यात आलं होतं. परंतु भूमिका छोटी असल्याने तिने नकार दिला. सीमाच्या  भूमिकेसाठी आयेशा जुल्कालाही विचारण्यात आलं होतं. परंतु तिनेही भूमिका छोटी असल्याने नकार दिला. (Unknown facts about Baazigar)

नदीम श्रवणने काजोलमुळे सोडला चित्रपट 

संगीतकार म्हणून या चित्रपटासाठी नदीम श्रावण यांना साइन करण्यात आलं होतं, पण त्यांनी निर्मात्यांसमोर काजोलला चित्रपटातून काढायची मागणी केली. कारण काजोलला एका चित्रपटासाठी साईन करायला गेले असताना तनुजा त्यांच्याशी असभ्य वागल्याचं नदीम यांनी सांगितलं. 

पुढे निर्मात्यांनी काजोलला चित्रपटातून काढून टाकण्यास नकार दिला. त्यामुळे नदीम श्रवणने चित्रपट सोडला. परंतु, त्यांनी “बाजीगर ओ बाजीगर” हे गाणं “जादुगर ओ जादुगर” असे शब्द लिहून तयार केलं होतं. नदीम श्रवण यांनी चित्रपट सोडल्यावर अन्नू मलिक यांची वर्णी लागली. तेव्हा त्यांनी स्वर कायम ठेवून गाण्याचे बोल बदलले.

राखीच्या भूमिकेचा ट्रॅक  

चित्रपटात राखीच्या भूमिकेला जो ट्रॅक दाखविण्यात आला आहे तो नंतर स्क्रिप्टमध्ये घेण्यात आला. जेव्हा सलमान खानला स्क्रिप्ट ऐकवण्यात आलं होतं तेव्हा हा ट्रॅक स्क्रिप्टमध्ये नव्हता.  (Unknown facts about Baazigar)

हे ही वाचा: बॅबिलॉन: हॉलिवूडचा प्रवास उलगडून सांगणारा महासिनेमा! कोण साकारणार चार्ली चॅप्लिनची भूमिका?

जेव्हा पाकिस्तानी राष्ट्राध्याक्षांकडून फिरोज खान यांच्या सिनेमांवर बंदी घातली गेली!

बाजीगर हा चित्रपट कहाणी होती अजय शर्मा उर्फ विकी मल्होत्राच्या सुडाची. ही कहाणी होती आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या प्रियाची. ही कहाणी आहे न्यायासाठी परस्परांविरुद्ध लढणाऱ्या नायक नायिकेची. शाहरुखप्रेमींनी हा चित्रपट बघितला असणार यात वादच नाही. परंतु शाहरुख आवडत नसेल तरी एक उत्तम कलाकृती म्हणून हा चित्रपट आवर्जून बघा.  

हे ही वाचा: जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…

आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bazigar Bollywood Bollywood Chitchat Entertainment Kajol shahrukh khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.