Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Dilwale Dulhania Le Jayenge : राज-सिमरनच्या लव्हस्टोरीला ३० वर्ष पूर्ण
बॉलिवूडच्या कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं… काजोल आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने दोघांचं अभिनय करिअर रातोरात बदलून टाकलं होतं… २० ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेल्या DDLJ चित्रपटाला आज रिलीज होऊन ३० वर्ष पूर्ण झाली… आजही सिमरन आणि राज यांच्या लव्हस्टोरी तरुणाईत क्रेझ आहे… इतकंच नाही तर मुंबईतल्या मराठा मंदिर या थिएटरमध्ये आजही DDLJ चित्रपटाचे शो सुरु आहेत… आज जाणून घेऊयात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी…

सगळ्यात पहिली महत्वाची बाब म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ movie) या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांनी Tom Cruise ला अप्रोच केलं होतं… त्यानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan) यालाही राजच्या भूमिकेसाठी ऑफर केली होती… पण या दोघांचंही काही जमून न आल्यामुळे शेवटी हा चित्रपट शाहरुख खान याला ऑफर झाला आणि त्याने या संधीच सोनं केलं… (Shah Rukh Khan)

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे चित्रपटाचं ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे नाव किरण खेर यांनी सुचवलं होतं… ले जायेंगे ले जायेंगे या गाण्यावरुन त्यांना हे नाव सूचलं आणि या चित्रपटाने तरुणच नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना वेड लावलं… (Kajol & Shah Rukh Khan)

खरं तर, DDLJ चित्रपटातील प्रत्येक गाणी, डायलॉग्स क्लालिक आहेतच… पण यातील मेहंदी लगाके रखना हे गाणं आजही ३० वर्ष उलटून गेली तरी प्रत्येक होणाऱ्या नवरीच्या मेहंदी प्लेलिस्टमध्ये असतंच… पण नेमकं हे याच चित्रपटाच्या गाण्याच्या प्लेलिस्टमध्ये नव्हतं…परंतु, नंतर हे गाणं चित्रपटात घेतलं आणि वेडिंग गाण्यांच्या हिटलिस्टमध्ये हे गाणं पहिल्या क्रमांकावर आहे यात शंकात नाही… ( Cult Classic movie)

या चित्रपटात शाहरुख खान याने बाईक चालवताना एक काळं जॅकेट घातलं आहे… त्या जॅकेटची एक खास गोष्ट आहे… ती अशी की, उदय चोप्राने हे ब्लॅक लेदर जॅकेट कॅलिफोर्नियाच्या Harley Davidson store मधून ४०० डॉलर्सना विकत घेतलं होतं… आणि त्यानंतर शाहरुख खानच्या या लूकने इतिहासच घडवला आहे…

पुढचा खास किस्सा असा तो म्हणजे शाहरुख खान आणि अमरीश पुरी (Amrish Puri) कबूतरांना दाणे देताना आओ आओ करत असतानाचा सीन मुळ स्क्रिप्टमध्ये नव्हता.. त्या दोघांनी ऑन द स्पॉट हा सीन इम्प्रोवाईज केला होता… अनेक रेकॉर्ड नावावर करणाऱ्या या चित्रपटाने १५०० आठवडे मराठा मंदिर थिएटरमध्ये पूर्ण केले आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi