Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला

मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला

Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

 Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…
कलाकृती विशेष

Indian Cinema : तेव्हा रंगलेले चित्रपट आता नक्कीच अळणी वाटतात…

by दिलीप ठाकूर 04/03/2026

खरंच काळ बराच पुढे सरकलाय, बदललाय… बी. आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित ‘पती पत्नी और वो’ (१९७८) चित्रपट त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल गर्दीत पाहताना सॉलीड धमाल आली होती. कमलेश्वर लिखित या चित्रपटात पती (संजीवकुमार) आपल्या पत्नी (विद्या सिन्हा) आणि लहान मुलासोबत सुखाने संसार करत असतानाच आपल्या कार्यालयात आलेल्या नवीन सेक्रेटरीसोबत (रंजीता) फ्लर्ट करतो, लगट करतो. आपल्या पत्नीच्या आजाराचे खोटे नाटक करून तब्येतीवरुन तिची सहानुभूती मिळवतो. आणि तिच्याशी जवळीक वाढवतो. आपलं हे छुपे उद्योग अंगलट आल्याचे पाहून तो पुन्हा आपल्या संसारात रमतो. तरी त्याची परस्त्रीला आपलेसे करण्याची खोड कायम असते. आता आणखी एक युवती ( परवीन बाबी) सेक्रेटरी म्हणून कामाला येते आणि तो तिची सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्या औषधांच्या डब्या टेबलावर मांडतो आणि चित्रपट संपतो… चित्रपट खुसखुशीत खुमासदार शैलीत पडद्यावर आला होता, म्हणूनच तो पाहावासा वाटला.

१९९० साली एक चित्रपट पाहिला होता, दासरी नारायण राव दिग्दर्शित ‘मेरा पती सिर्फ मेरा है’. या चित्रपटातील दाम्पत्य (जितेंद्र आणि रेखा) सुखाने संसार करत असतानाच एका युवतीला (राधिका) हाच पुरुष आवडू लागतो. ती त्याला आपलंसं करण्यासाठी बरेच बरे वाईट उद्योग करते. पण ते अपयशी ठरतात. एका तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. साऊथचे प्रोक्शन असल्याने चित्रपट झगमगाटी आणि चमकदार होता. त्या काळात अशा ‘ स्टोरीज ‘ काय भारी वाटायच्या हो. रंगेल वृत्तीचा पती कितीही भरकटला तरी पिक्चरचा शेवटी (क्लायमॅक्स) आपल्या पत्नीकडेच येई. अगदी पतीकडून ‘एक ही भूल’ झाली आणि पत्नी त्याच्यावर रागावली, रागाने लालबुंद होत माहेरी गेली तरी चित्रपटाच्या शेवटी क्लायमॅक्सला तिचा गैरसमज दूर होई आणि ते परत आपल्या सुखी वैवाहिक जीवनात रमत….

आज असे चित्रपट कोण पाहणार? त्याहीपेक्षा भारी भारी गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसताहेत आणि त्यातही मसालेदार मनोरंजन आहे आणि त्यात शेवटी क्लायमॅक्सला ठाम निर्णय घेतला जातोय. साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी थलापती विजय याच्या पत्नीने म्हणजेच संगीता सोरनालिगम हिने तब्बल २७ वर्षांच्या संसारानतर आपल्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि सगळीकडे उलटसुलट चर्चा सुरू झाली. अशातच त्याचा मुलगा जोसेफ संजय याने आपल्या पित्यालाच अनफॉलो करत आपण आपल्या आईच्या बाजूने उभे आहोत हे सुचित केले.

================================

हे देखील वाचा : Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे होते…..

================================

अजून त्याच्या मुलीने नेमका कोणता निर्णय घेतला हे जाहीर व्हायचे आहे. दरम्यान थलपती विजय याच्या एका अभिनेत्रींसोबतच्या अफेअरमुळे त्याच्या पत्नीने हा रोखठोक निर्णय घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे.‌ तात्पर्य, अशा गोष्टीत चित्रपटात जे दाखवतात तसे होणार नाही. आपल्या पतीला अजिबात माफ न करता त्याच्या पत्नीने आपला वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, अशी घटस्फोटाची प्रकरणे वाढलीत, आणि त्यात धक्कादायक असं काहीही नाही असा ॲप्रोच ठेवत अनेक पती पत्नी सोशल मीडियात पोस्ट शेअर करत ‘आम्ही आता वेगळे झाले आहोत’ असे सांगत आहेत. आता पडद्यावर चित्रपट यायला हवा, घटस्फोटानतरचे जीवन. ते किती आनंदी आणि समाधानी आहे याची गोष्ट त्यात असावी. जुन्या काळातील चित्रपटातील काही गोष्टी आता नक्कीच अळणी वाटतात हे नक्की. त्या चित्रपटांची रिळे तशीच पडद्याआड जाऊ देत…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.