Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Urmila Matondkar ९० चे दशक गाजवणारी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर
आजवरच्या हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी ही सिनेमासृष्टी कमालीची गाजवली. यातल्या अनेक अभिनेत्री या मराठी, महाराष्ट्रीय होत्या. अगदी दुर्गाबाई कामत यांच्यापासून ते अगदी अमृता खानविलकर, सई ताम्हणकरपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या प्रतिभेने हिंदी सिनेमात स्वतःची ओळख निर्माण केली. यातलेच एक मोठे नाव म्हणजे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar).
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने, डान्सने आणि सौंदर्याने उर्मिलाने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले. बॉलिवूडमध्ये उर्मिलाने मोठे यश संपादन केले. तिने ९० च्या दशकातील जवळपास सर्वच सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले. गोविंदा, जॅकी श्रॉफ यांच्यापासून ते अक्षय कुमार, सलमान, शाहरुख, आमीरपर्यंत सर्वच अभिनेत्यांसोबत तिने हिट सिनेमे दिले. आज उर्मिला तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्मिलाची अभिनय कारकीर्द अनेक कारणांनी खूपच गाजली. हिंदीसोबतच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये तिने काम करत आपली ओळख तयार केली. (Urmila Matondkar Birthday)

उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. श्रीकांत मातोंडकर आणि सुनीता मातोंडकर हे तिचे आई वडील होते. तिने तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. तिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने ती केवळ तीन वर्षाची असताना १९७७ मध्ये बीआर चोप्रा यांच्या ‘कर्म’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर तिने ‘कलयुग’, ‘बडे घर की बेटी’, ‘डाकूट’, ‘भावना’, ‘संगम’ या सिनेमात देखील तिने बालकलाकार म्हणून केले. याशिवाय ती श्रीराम लागू यांच्या ‘झाकोळ’ या मराठी सिनेमात देखील बालकलाकारांच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर १९८३ साली आलेल्या ‘मासूम’ या सिनेमात तिने साकारलेल्या बालकालाकराची भूमिका खूप गाजली देखील. (Bollywood Tadka)
पुढे उर्मिलाने १९९१ साली सनी देओलसोबतच्या ‘नरसिंहा’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. पुढे ती शाहरुख खानसोबत ‘चमत्कार’ या चित्रपटात दिसली. त्यानंतर तिने साऊथस्टार कमल हसनसोबत ‘चाणक्य’ या मल्याळम सिनेमात काम केले. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर ती अनेक साऊथ आणि हिंदी सिनेमांमध्ये झळकली. १९९५ साल तिच्यासाठी खूपच महत्वाचे आणि करियरला मोठी कलाटणी देणारे ठरले. या वर्षी ती राम गोपाळ वर्मा यांच्या ‘रंगीला’ या सिनेमात दिसली. या सिनेमात ती जॅकी श्रॉफ आणि अमीर खान यांच्यासोबत झळकली. रंगीला सिनेमात तिने साकारलेली बोल्ड आणि ग्लॅमरस भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली. (Ankahi Baatein)

रंगीला सिनेमाने उर्मिला एक नवीन ओळख आणि अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने अफलातून, जानम समझा करो, सत्या, मस्त, जंगल, प्यार तुने क्या किया, भूत अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध पद्धतीच्या भूमिका साकारल्या. व्यावसायिक आयुष्य गाजत असताना दुसरीकडे उर्मिलाचे वैयक्तिक आयुष्य देखील कमालीचे गाजत होते. राम गोपाळ वर्मा यांच्यासोबत अनेक सिनेमे करताना तिचे नाव त्यांच्यासोबत जोडले गेले. (Entertainment mix masala)
उर्मिलाने राम गोपाळ वर्मासोबत १३ चित्रपट केले आहेत. राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करत असल्याने, उर्मिला इतर दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार देत होती. उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूडमध्ये मीडियामध्ये चर्चेत होत्या. अनेक बातम्यांनुसार राम गोपाळ वर्माची पत्नी असलेल्या रत्ना यांनी एक दिवस या बातम्यांमुळे सेटवर जाऊन उर्मिला मातोंडकरला थोबाडीत मारली होती. (Bollywood Masala)

या प्रकरणानंतर उर्मिला आणि राम गोपाळ वर्मा यांच्यात दुरावा आला. याचा परिणाम तिच्या करियरवर देखील झाला. सुरुवातील राम गोपाळ वर्मा यांच्यासोबतच काम करण्यासाठी इतर दिग्दर्शकांना नकार दिल्यामुळे पुढे तिला कोणीच काम देण्यास तयार झाले नाही आणि ती बॉलिवूडमधून गायब झाली. पुढे २०१६ साली तिने तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यापारी मोहसिन अख्तरसोबत लग्न केले.
======
हे देखील वाचा : Sanket Korlekar ‘आई-वडिलांनी स्वतःचं पोट मारलं’ अभिनेता संकेत कोर्लेकरची भावनिक पोस्ट
======
२०१९ साली उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिने लोकसभा निवडणूक देखील लढवली. मात्र ती निवडणूक हारली. पुढे २०२० साली उर्मिलाने शिवसेनमध्ये प्रवेश केला. आजही ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कार्यरत आहे.