Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Aai Kuthe Kay Karte मालिकेत अखेर वीणाची होणार एंट्री; ‘ही’ अभिनेत्री साकरणार भूमिका !
मनोरंजन सृष्टीत खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकांमध्येही आता लग्नाचं वारे वाहताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशा आणि अनीशचे लग्न हा चर्चेचा विषय बनला होता. आता अखेर या मालिकेत ईशा आणि अनीश चा साखरपुडा पार पडणार आहे. याच प्रसंगी मालिकेत मोठा ट्विस्ट सुद्धा येणार आहे, नुकताच आई कुठे काय करते मालिकेचा नव्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार आता लवकरच प्रेक्षकांना मालिकेत येणारे नवे वळण पाहायला मिळणार आहे. (Aai Kuthe Kay Karte)

आई कुठे काय करते या मालिकेत गेले अनेक दिवस वीणा या पात्राचा उल्लेख वारंवार येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही वीणा नेमकी आहे कोण आणि तिची मालिकेत एण्ट्री नेमकी कशासाठी होतेय याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. मात्र आता प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर येणार असून ज्या पात्राविषयी इतकं भरभरुन बोललं जात आहे त्या वीणाची लवकरच आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार आहे. वीणा म्हणजे आशुतोषची आत्ये बहिण आहे, आई-वडिलांचं लहानपणीच निधन झाल्यानंतर आशुतोषच्या आई-बाबांनी तिचा संभाळ केला. वीणा खूप मोकळ्या मनाची आहे, तिला प्रवासाची आवड आहे. कोणत्याही गोष्टीत अडकून रहाणं तिच्या तत्वात बसत नाही. म्हणूनच एक दिवस निरोपाची चिठ्ठी देऊन वीणा आशुतोषच्या घरातून निघून गेली. वीणाच्या जाण्याने सर्वांनाच वाईट वाटलं, वीणाचे खुशालीचे फोन येत असत, मात्र आता अखेर इतक्या वर्षांनंतर वीणा पुन्हा एकदा येतेय.

सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे वीणाची भूमिका साकारणार असून आई कुठे काय करते मालिकेच्या कुटुंबात सामील होण्यासाठी ती सुद्धा खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना खुशबू म्हणते, ”माझ्या आयुष्यातली पहिली मालिका धर्मकन्या मी स्टार प्रवाहवर केली होती. त्यानंतर जवळपास १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोहत काम करतेय. आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अत्यानंद होतोय.”(Aai Kuthe Kay Karte)
==========================
हे देखील वाचा: शिवानी सुर्वे झळकणार हिंदी सिनेमात,’अनलॉक जिंदगी’ लवकरच येणार भेटीला
==========================
खुशबूची म्हणजेच वीणाची भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक याबाबत अद्याप काहीही समजलेलं नाही. मात्र मालिकेत वीणाच्या येण्याने अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात बरीच उलथापालथ घडणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेचे यापुढील भाग आणखी उत्कंठावर्धक होतील यात शंका नाही.