Supriya Pathak वाढदिवस खास मनोरंजनविश्वातील अष्टपैलू अभिनेत्री -सुप्रिया पाठक
Veena Jamkar आणि Vanita Kharat झाल्या सख्ख्या शेजारी!
‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात.’ हे तुम्हालाही पटत असेल ना? तर आता डॉन अभिनेत्री अशाच सख्या शेजारी झाल्या आहेत. गुणी अभिनेत्री वीणा जामकर (Veena Jamkar) आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या आहेत. आगामी ‘इलू इलू’ (Ilu Ilu )या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना दिसतील. फाळके फिल्म एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला तुमच्या आमच्या भेटीला येत आहे.(Veena Jamkar & Vanita Kharat Together)
पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आप्त स्वकीय यांसारखे असायचे. सगळ्या सुख दुःखा मध्ये त्यांचा सहभाग हा असायचा. त्यातून अनेक गमतीदार किस्से सुद्धा घडायचे, या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमिताने वीणा जामकर आणि वनिता खरात या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. आणि संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत. ‘आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं या दोघी सांगतात. धमाल अनुभव असणारा ‘इलू इलू’ चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास ही दोघी व्यक्त करतात’.
‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांनी लिहिली आहेत. या सिनेमाचे निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके आहेत तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. तसेच छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.
==============================
हे देखील वाचा: Elli Avrram:’इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री !
==============================
वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत. येत्या ३१ जानेवारीला ही लव्हस्टोरी आपल्या भेटीला येणार आहे.