Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

वयाच्या ८४ व्या वर्षी Doctor Of Arts पदवी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते Govardhan Asrani यांचं निधन
भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचं २० ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं… गेल्या काही दिवसांपासून फुप्फुसांच्या समस्येमुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते… अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली…. असरानी यांनी केवळ हिंदीच नाही तर गुजराती चित्रपटसृष्टीतही महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स केले होते… शिवाय, वयाच्या ८४ व्या वर्षी Doctor of Arts ही पदवी मिळवणाऱ्या विनोदवीर असरानी यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी शोकाकूल झाली आहे…

FTI मध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलेल्या असरानी यांनी १९६७ साली ‘Hare Kanch Ki Chooriyan’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची सुरुवात केली… सुरुवातीच्या काळात गंभीर भूमिका करणाऱ्या असरानी यांनी कालांतराने विनोदी भूमिका साकारयला सुरुवात केली आणि त्यात तो त्यांचा हातखंडाच झाला… ५ दशकांहून अधिक काळ काम करणाऱ्या असरानी यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे…. ‘शोले’ चित्रपटातील जेलर ही भूमिका त्यांची विशेष गाजली… (Govardhan Asrani death news)

मात्र याव्यतिरिक्त, ‘तवायफ’, ‘जवाब हम देंगे’, ‘कर्ज’, ‘बिवी हो तो ऐसी’, ‘रखवाला’, ‘सनम’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘हसिना मान जायेगी’, ‘चल मेरे भाई’, ‘मेला’, ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’, ‘बागबान’, ‘भागम भाग’, ‘धमाल’, ‘भूल भूलैय्या’, ‘वेलकम’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत त्या अजरामर केल्या… २०२३ मध्ये आलेला ‘ड्रीम गर्ल २’ हा त्यांचा अभिनेता म्हमून शेवटचा चित्रपट ठरला…
अभिनयासोबतच असरानी यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.. त्यांनी ‘Chala Murari Hero Banne’ हा विनोदी चित्रपट स्वतः दिग्दर्शित करून प्रमुख भूमिका साकारली होती. असरानी यांना ‘सिच्युएशनल कॉमेडी’चे मास्टर म्हटलं जात होतं… असरानी यांनी त्यांच्या निधनाच्या आधी सोशल मिडियावर पोस्ट केली होती… यात त्यांनी सगळ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या… आयुष्यभर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या बहुआयामी कलाकाराची शेवटची पोस्ट देखील हॅप्पी दिवाळी हीच ठरली….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi