
संतोष जुवेकरच्या ‘त्या’ विधानावर Vicky Kaushal याची प्रतिक्रिया!
२०२५ या वर्षाची दमदार सुरुवात विकी कौशलच्या ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपटाने केली… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र मांडण्यात आलं आहे… या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं… मात्र, अभिनेता संतोष जुवेकर याने नंतर मुलाखतीत केलेल्या काही विधानांमुळे त्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं… आता यावर स्वत: विकी कौशल याने प्रतिक्रिया देत संतोष जुवेकरची बाजू घेतली आहे…

अभिनेता संतोष जुवेकर याने झेन एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, नुकतच मॅडॉक प्रोडक्शनने ‘छावा’ या सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल सेलिब्रेशन पार्टी ठेवलेली तेव्हा तिथे लक्ष्मण सर आणि विकी कौशल दोघेही भेटले. त्यावेळी विकी मला म्हणाला की, “तू माझ्यापेक्षाही जास्त लोकप्रिय झालास रे. संत्या या गोष्टी सोडून टाक. त्यांचा इतका विचार करू नकोस. तू काय आहेस, कसा आहेस, माणूस म्हणून कसा आहेस हे तुझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार कर. जी लोकं ट्रॉलिंग करत आहेत त्यांना माहित नाही आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल इतका विचार करू नकोस. हे चालूच राहील. ही लोकं बोलत राहणार तू जर त्यांना उत्तर दिलं तर ते अजून बोलणार. ते तुझ्या उत्तराची वाट बघत आहे. त्यामुळे मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही”.
===========================
हे देखील वाचा:Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
===========================
तर, आधी झालं असं होतं की, संतोष जुवेकर याने मुलाखतीत म्हटलं होतं की विकी कौशलला मी सेटवर नसलो की करमायचं नाही… अगदी दिग्दर्शकांनी मला बोलवून घेतलं होतं.. इतकंच नाही तर तो असं देखील म्हणाला होता की, मी औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे अजिबात बघितलं पण नाही आणि बोललोही नाही. मला ते पटत नव्हतं. आम्ही अगदी समोरासमोर बसलेलो पण तरीही मी त्याच्याशी बोललो नाही. संतोषला याच वक्तव्यांवनवरुन फार ट्रोल केलं गेलं होतं…
================================
हे देखील वाचा : Sikandar : पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’ विकीच्या ‘छावा’ला मागे टाकू शकला?
=================================
दरम्यान, छावा चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, किरण करमरकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या…तर जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi