Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Vicky Kaushal दारु आणि मांसाहार सोडणार?
२०२५ हे वर्ष हे खऱ्या अर्थाने विकी कौशलचं होतं यात शंका नाही… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने इतिहासच रचला… बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या चित्रपटाने धुमाकूळ घातला… छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता विकी ‘महावतार’ (Mahavatar Movie) या पौराणिक चित्रपटासाठी सज्ज झाला आहे… काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला असून अमर कौशिक ‘महावतार’चं दिग्दर्शन करणार आहेत… कलाकार एखादं पात्र साकारण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करतात आणि कष्टही घेतात.. अशीच ताहीशी युनिक गोष्ट विकी कौशल ‘महावतार’ चित्रपटासाठी करणार असल्याचं समोर आलं आहे… नेमका कोणता त्याग तो करणार आहे जाणून घेऊयात…

तर, मीडिया रिपोर्टनुसार आगामी ‘महावतार’ चित्रपटासाठी फिजिकली विकी कौशल फिट तर होतोच आहे पण त्यासोबतच भगवान परशुराम यांची भूमिका तो साकारणार असल्यामुळे त्याने आपली जीवनशैली बदलण्याचा विचार केला आहे… असं सांगितलं जात आहे की विकी या भूमिकेसाठी दारू आणि मांसाहार सोडणार आहे. भगवान परशुराम यांची कथा यात प्रेक्षकांना दिसणार असून भक्तीमय वातावरणात आणि त्याच ऑरामध्ये हा चित्रपट पूर्ण व्हावा यासाठी अमर कौशिक आणि विकी कौशल यांनी आपलं सर्वस्व देण्याचा निर्धार केल्याचं देखील सांगितलं जात आहे…
================================
हे देखील वाचा : Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?
================================
विकी कौशलच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर चित्रपटात दिसणार असून यात. त्याच्यासोबत यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील असणार आहेत… लवकरच ‘लव्ह अँड वॉर चित्रपटाचं शुटींग संपणार असून विकी कौशल महावतार चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi