लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून नव्याने रंगभूमीशी नातं जोडणार !
Sundar Mi Honar Natak: ज्येष्ठ अभिनेता विद्याधर म्हणजेच बाप्पा जोशी तब्येतीसह त्यांच्या सुरु असलेल्या लढाईनंतर आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहेत. दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि शारीरिक थकव्यामुळे काही काळ नाट्यसृष्टीपासून दूर गेलेले जोशी आता पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात एका अत्यंत संवेदनशील भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यातील झळाळी पाहता, हे पुनरागमन केवळ अभिनय नव्हे, तर त्यांच्यासाठी जीवनाची नव्याने सुरूवात ठरते आहे.(Actor Vidyadhar Joshi New Natak)

विद्याधर जोशी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जेव्हा या नाटकासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी हे नाटक ना वाचलेलं होतं ना पाहिलेलं. मात्र डॉ. श्रीराम लागू यांनी साकारलेली मुख्य भूमिका आपल्याला करायची आहे, हे समजल्यावर त्या जबाबदारीचं भान त्यांना लागलं. संहितेचा अभ्यास केल्यानंतरच त्यांनी ही भूमिका स्वीकारली. संयमी पण उत्साही आवाजात त्यांनी हे अनुभव कथन केलं.आजारी अवस्थेतून पुनः रंगभूमीकडे वळणं हे शारीरिक जितकं आव्हानात्मक असतं, तितकंच ते मानसिक धैर्याची कसोटीही असते. “शंका होत्या… शरीर साथ देईल का? तालमी करता येतील का? पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला समजून घेतलं आणि मला बळ दिलं,” असं ते सांगतात. अभिनयाच्या तयारीने त्यांचा फोकस आजारावरून हलून सर्जनशील प्रक्रियेकडे वळला, आणि त्यांच्या मते, याच मानसिक उल्हासाने त्यांना खऱ्या अर्थाने बरे होण्याचं बळ दिलं.
=============================
हे देखील वाचा: Mrunmayee Deshpande: ६ अभिनेत्यांसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार!
=============================
‘सुंदर मी होणार’मध्ये जोशी एक फॅमिली डॉक्टर साकारत आहेत, जो एका संस्थानिक घराण्याच्या मुलांना लहानपणापासून वाढवतो. त्यांचं प्रेम, त्याग आणि निःस्वार्थ भावनेनं हे पात्र भरलेलं आहे. ही भूमिका केवळ अभिनय सादरीकरण नव्हे, तर एक भावनिक प्रवास आहे. सुमारे सहा-सात वर्षांनंतर जोशी रंगभूमीवर परतत आहेत. कोविडपूर्वीचं शेवटचं नाटक ‘कुत्ते कमीने’ हे होतं. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने थांबावं लागलं. पण आता ‘सुंदर मी होणार’मुळे मी पुन्हा रंगभूमीवर आलो आहे, हेच माझं खऱ्या अर्थाने पुनरागमन आहे,” असं त्यांनी आनंदाने सांगितल.

हे पुनरागमनही एका खास क्षणी घडत आहे. पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष यानिमित्त हे नाटक पुन्हा नव्याने सादर केलं जात आहे. या सेलिब्रिटी सादरीकरणाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे, ज्यांनी याआधी ‘ती फुलराणी’ आणि ‘हिमालयाची सावली’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे.
================================
हे देखील वाचा: Jarann Movie: सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले करणार प्रेक्षकांवर ‘जारण’
================================
या नव्या संचात विद्याधर जोशींसोबत आस्ताद काळे, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई, अमोल बावडेकर यांसारखे अनुभवी कलाकार असून, सृजन देशपांडे, श्रुती पाटील आणि विराजस ओढेकर यांचा नव्या दमाचा उत्साही सहभागही असेल. नाटकाची निर्मिती आकाश भडसावळे आणि करण देसाई यांनी केली आहे. पहिला प्रयोग १२ जून रोजी पुण्यात, तर दुसरा १३ जून रोजी मुंबईत सादर होणार आहे.