लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण लग्न कधी?
बऱ्याच महिन्यांपासून सुरु असणारी चर्चा अखेर खरी ठरली आहे… अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपूडा उरकून घेतला आहे… विजयच्या टिमने हिंदुस्थान टाईम्ससोबत ही अधिकृत माहिती शेअर केली असून अखेर रिलेशनमध्ये असणाऱ्या विजय आणि रश्मिकाच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे… (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna engagement)

तसेच, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत असून अद्याप यावर विजय किंवा रश्मिकाकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे… दरम्यान, बऱ्याचवेळा विजय आणि रश्मिकाला एकत्र पाहिलं गेलं होतं… इतकंच नाही तर या वर्षीच्या रश्मिकाच्या वाढदिवसाला देखील ते एकत्र होते हे सिद्ध करणारे फोटो देखील व्हायरल झाले होते… आत्तापर्यंत दोघांनी आपल्या नात्याबद्दल फारच गोपनियता पाळली असून अजूनही साखरपुड्याचे फोटो समोर येऊ दिले नाही आहेत… (Entertainment news)
================================
हे देखील वाचा : Thama : ‘खूनी प्रेम कहानी…; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा अनोखा थरार!
=================================
विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांनी एकत्रित ‘डिअर कॉमरेड’, ‘किंगडम’, ‘गीथा गोविंदम’ अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं… आणि लवकरच आणखी एका चित्रपटात दोघे पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असं सांगितलं जात आहे… शिवाय, लवकरच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची माहिती अधिकृतपणे समोर यावी यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत…(Rashmika and Vijay marriage)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi