
Vijay Mallya याने ‘या’अभिनेत्रीचं केलेलं कन्यादान!
सोशल मिडियावर तशा अनेक मुलाखती धुमाकूळ घालत असतात पण सध्या विजय माल्या (Vijay Mallya) याची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. खरं तर क्रिकेट, अभिनेत्रींसोबत अफेअर किंवा बिजनेसच्या कुठल्याना कुठल्या कारणासाठी विजय माल्या हे नाव समोर येतंच…नुकतीच १८ वर्षांनी पहिल्यांदा RCB ने आयपीएल (IPL 2025) मॅच जिंकली आणि तिथे लंडनमध्ये माल्याने सेलिब्रेशन केलं. भारताबाहेर असूनही भारतातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या विजय माल्याने देश सोडून जाण्यापूर्वी एका अभिनेत्रीचं कन्यादान केलं होतं हे माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात याबद्दल…(Bollywood News)

तर, विजय माल्या याने भारत सोडण्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Redyy) हिचं कन्यादान केलं होतं. खुद्द समीरानेच २०१४ मध्ये डीएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही आठवण सांगितलं होती. समीराने अक्षय वर्दे यांच्यासोबत मराठी परंपरेनं २१ जानेवारी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. समीरा या मुलाखतीमध्ये म्हणाली की,’फक्त विजय माल्या, जे माझ्या आईच्या बाजूने माझे नातेवाईक लागतात. त्यांनीच माझं कन्यादान केलं. माझ्या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते”.(Entertainment gossip)
================================
=================================
सध्या सोशल मिडियावर सक्रिय असणारी समीरा रेड्डी चित्रपटांपासून दूर गेली आहे. आता केवळ आपला संसार आणि मुलं यांच्यात रमणाऱ्या समीराने मात्र बॉलिवूडचा एक काळ आपल्या अभिनय, अदाकारी आणि डान्सने गाजवला आहे. समीराने मैने दिल तुझको दिया, नो एन्ट्री, कालपुरुष, टॅक्सी नं ९२११, नक्शा, रेस, दे दणा दण अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.(Sameera Reddy Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi