Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

व्हायरल पोस्ट: ‘…हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे’ – अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

 व्हायरल पोस्ट: ‘…हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे’ – अभिनेत्री उर्मिला निंबाळकर
आईच्या गावात

व्हायरल पोस्ट: ‘…हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे’ – अभिनेत्री उर्मिला निंबाळकर

by Team KalakrutiMedia 07/04/2022

मनोरंजनविश्वात वावरणाऱ्या अनेक अभिनेत्री या त्यांच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर या अभिनेत्री त्यांची परखड मते नेहमीच मांडत असतात. यामध्ये मराठी अभिनेत्री देखील मागे नाहीत.

मराठी मनोरंजनविश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या स्पष्ट मतांसाठी ओळखल्या जातात. कोणत्याही विषयावर मत मांडणे, ट्रोलर्सला फाटकारने आदी अनेक गोष्टी त्या लीलया करतात. अशीच एक मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि यूटुबर असलेली उर्मिला निंबाळकर तर सर्वांना माहीतच आहे. उर्मिला नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसते. सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्री असलेली उर्मिला काही महिन्यांपूर्वीच आई झाली.

उर्मिलाने तिच्या यूट्यूब चॅनेलच्या आणि पोस्टच्या माध्यमातून तिच्या या सुंदर प्रवासाची माहिती लोकांना दिली. उर्मिलाला अनेकदा तिच्या पोस्टमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला, मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ती तिचे काम करते.

Urmila Nimbalkar on Twitter: "Did anyone say Saree? #SareeTwitter  https://t.co/HKBLJPlx7E" / Twitter

=====

हे देखील वाचा: प्रेमा काय देऊ तुला? – अशोक सराफ यांना उद्देशून निवेदिता सराफ यांनी केली खास पोस्ट शेअर

====

नुकतीच उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, ही पोस्ट तिने तिच्या नवऱ्याला उद्देशून लिहिली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये तिच्या नवऱ्याचा आणि मुलाचा फोटो शेअर करत लिहिले, “त्याला लाज नाही वाटत, बाळाला पोटाशी बांधून फिरायला न्यायची. बघतात फिरताना लोक नजर रोखून, बिघडलीय आत्ताची पिढी, असंही मनात म्हणत असतील. पण बाळाचे लंगोट बदलण्यापासून, ते माझ्या शुटिंगच्या दरम्यान, त्याला संपूर्णपणे सांभाळण्यापर्यंत तो सगळं मनापासून आनंदाने करत असतो. आणि हे सगळं स्वतःचं उत्तमरित्या करिअर सांभाळून!”

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

पुढे उर्मिलाने लिहिले, ” जेव्हा आयुष्याचा जोडीदार असं म्हटलं जातं, तेव्हा बाळ सांभाळण्याची जबाबदारी मात्र फक्त स्त्रीवर येऊन पडते. दूधासाठी बाळाला आईच हवी पण इतर सर्व कामे, पुरुष उत्तम करु शकतात, ज्यांनं स्त्रीला पुरेशी विश्रांतीही मिळते आणि तिच्या करिअरकडे तिला लक्ष देण्यासाठी थोडी उसंतही.

मी आणि सुकीर्त एका प्रायोगिक नटकाच्या संस्थेत भेटलो, तेव्हाही तो स्रीयांच्या प्रश्नाकडे अतिशय कळकळीने, आदराने पहायचा. लग्न झाल्यानंतरही उचित ठिकाणी त्यानं स्वतःच्या आयुष्यातील प्रत्त्येक स्त्रीची बाजू घेतली. त्याच्या आईची बाजू, सहकारी, मी, माझी आई, मैत्रीण सर्वांचं म्हणणं अतिशय empathetically त्याला समजून घेतां येतं. जेव्हा बाळ झालं तेव्हाही पठ्ठ्यानं साथ सोडली नाही. हे पुरुषाचं खरं पुरुषत्व आहे.”

====

हे देखील वाचा: देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’

====

सध्या उर्मिलाची ही पोस्ट खूपच व्हायरल होत असून, अनेकांनी तिचे तिच्या या पोस्टबद्दल कौतुक केले आहे. उर्मिला अतिशय उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध यूटुबर देखील आहे. ती नेहमीच तिच्या यूट्यूब चॅनेलवर, मेकअप, प्रवास, त्वचेची काळजी आदी विषयांवरील विविध व्हिडिओ शेअर करत असते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Celebrity News Entertainment Instagram Post marathi actress Urmila Nimbalkar
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.