Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

WAAMA : स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणारा ‘वामा’ २३ मे रोजी होणार प्रदर्शित
WAAMA: स्त्रीशक्तीचे प्रखर आणि प्रभावी दर्शन घडवणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ (Waama Ladhai Sanmanachi) हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून नुकतेच या चित्रपटाचे भन्नाट पोस्टर ही सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून तरी हा स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे कळतेय. (Waama Marathi Movie )

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ( Kashmira Kulkarni) झळकत असून तिच्या नजरेतील तीव्र क्रोध आणि आत्मविश्वासू ही दिसत आहे. तिच्या या लुकमुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे हे नक्की. (Waama Marathi Movie)
================================
================================
दिग्दर्शक अशोक आर. कोंडके (Ashok R. Kondke) म्हणतात,” ‘वामा’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा विषय खूप महत्त्वपूर्ण असून तो आजच्या स्त्रियांसाठी गरजेचा आहे. आज समाजात स्त्रीला दिला जाणारा सन्मान केवळ शब्दांपुरताच सीमित राहिलाय, प्रत्यक्षात अजूनही तिच्यावर अन्याय होतोच आहे. ‘वामा’ या चित्रपटातून मी ही वास्तविकता थेट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन म्हणून नाही तर विचारांच्या पातळीवरही हा चित्रपट अनुभवावा, हीच माझी अपेक्षा आहे.”(Waama Marathi Movie)
==============================
हे देखील वाचा: Atali Batami Fhutali Movie Teaser: ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर भेटीला !
==============================
चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात,” ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट फक्त एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नाही, तर समाजाच्या मानसिकतेविरुद्ध चाललेली ही एक जोरदार लढाई आहे. आजच्या काळातही अनेक महिला आपल्या अधिकारांसाठी, सन्मानासाठी झगडत आहेत. ‘वामा’मधून आम्ही त्याच लढ्याला आवाज दिला आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट रसिकांना नक्की आवडेल”.