
War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?
रजनीकांत आणि ह्रतिक रोशन तब्बल ३९ वर्षांनी एकमेकांसमोर आले आहेत… निमित्त आहे दोघांच्या कुली आणि वॉर या चित्रपटांचं… १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग कमाई केली… प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या या दोन्ही चित्रपटांना संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.. चला तर जाणून घेऊयात २ दिवसांमध्ये या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली आहे…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या ‘कुली’ (Coolie) चित्रपटाने दोन दिवसांमध्ये ११९.७५ नेट कलेक्शन आणि वर्ल्डवाईड २४५ कोटी कमावले आहेत.. तर ह्रतिक रोशन याच्या ‘वॉर २’ (War 2) चित्रपटाने दोन दिवसांमध्ये १२१.८४ कोटी कमावले आहेत.. (Box office collection)
================================
=================================
दरम्यान, आता वीकेंडला ‘वॉर २’ आणि ‘कुली’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये किती वाढ होणार याकजे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… शिवाय सिनेसृष्टीतील ५० वर्षांची कारकिर्द पुर्ण करणाऱ्या रजनीकांत यांचा हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा गाठेल का याकडेही त्यांचे चाहते डोळे लावून बसले आहेत… शिवाय, ज्यु. एनटीआर याचा वॉर २ हा बॉलिवूड डेब्यु असून हिंदीत प्रेक्षकांना त्याचं काम किती आवडतं हे येणारा काळच ठरवेल…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi