
War 2 Vs Coolie : बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची कमाई झाली तरी किती?
रजनीकांत आणि ह्रतिक रोशन तब्बल ३० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकमेकांच्या समोर आले होते… निमित्त होतं ‘कुली’ आणि ‘वॉर २’ या त्यांच्या चित्रपटाचं… विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमधून दोन कलाकारांनी बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती… कुली चित्रपटातून आमिर खान याने तमिळ चित्रपटसृष्टीत आणि ज्युनिअर एनटीआर याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं… १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.८५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी, चौथ्या दिवशी ३२.६५ कोटी, पाचव्या दिवशी ८.७५ कोटी, सहाव्या दिवशी ९ कोटी, सातव्या दिवशी ५.७५ कोटी, आठव्या दिवशी ५ कोटी, नवव्या दिवशी ४ कोटी, दहाव्या दिवशी ६.८५ कोटी, अकराव्या दिवशी ७.३५ कोटी, बाराव्या दिवशी २.१५ कोटी, तेराव्या दिवशी आत्तापर्यंत ०.७ कोटी कमवत आत्तपर्यंत २२५.२ कोटींची कमाई केली आहे...(War 2 box office collection)
================================
हे देखील वाचा : ह्रतिक रोशनच्या ‘War 2’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ?
=================================
तर, रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाने पहिल्या दिवशी ६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ५४.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३९.५ कोटी, चौथ्या दिवशी ३५.२५ कोटी, पाचव्या दिवशी १२ कोटी, सहाव्या दिवशी ९.५ कोटी, सातव्या दिवशी ७.५ कोटी, आठव्या दिवशी ६.१५ कोटी, नवव्या दिवशी ५.८५ कोटी, दहाव्या दिवशी १०.५ कोटी, अकराव्या दिवशी ११.३५ कोटी, बाराव्या दिवशी २.५२ कोटी, तेराव्या दिवशी ०.७६ कोटी कमवत आत्तापर्यंत २६०.६३ कोटींची कमाई केली आहे…(Coolie box office collection)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi