Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?
सध्या मनोरंजनसृष्टीत मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेतील वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. Action, थ्रिलर, रोमॅंटिक अशा विविध पठडीतील चित्रपटांच्या शर्यतीत प्रत्येकजण सरस ठरत आहे. लवकरच ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यासोबत साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एन.टी.आर(Jr NTR) बॉलिवूडमध्ये War २ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. दोन सुपस्टार असलेला ‘वॉर २’ (War 2) चित्रपट रिलीज आधीच कोट्यावधींचा व्यवसाय करणार अशी माहिती मिळत आहे. काय आहे अपडेट वाचा…(Entertainment update)

‘वॉर २’ हा एक ॲक्शन चित्रपट मीडिया रिपोर्टनुसार, रिलीज होण्याआधीच जवळपास ८५ ते १२० कोटींची कमाई करणार असं सांगितलं जात आहे. ‘वॉर 2’च्या निर्मात्यांना तेलुगू भाषेतील चित्रपटासाठी एक मोठी ऑफर दिल्यामुळे असं होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरं तर बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड प्रत्येक चित्रपट १०० कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करत आहेच. पण प्रदर्शनाआधीच जर का हा टप्पा ‘वॉर २’ ने पार केला तर नक्कीच हा एक रेकॉर्ड होऊ शकतो. (Bollywood news)
=====================================
हे देखील वाचा: Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !
=====================================
दरम्यान, २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’ (War) चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात ह्रतिक रोशनसोबत टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि वाणी कपूर झळकले होते. आता ‘वॉर २’ मध्ये ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असणार आहे. याशिवाय चित्रपटात कियारा अडवाणी (Kiara Advani), जॉन अब्राहम देखील असणार आहेत. तसेच, १४ ऑगस्ट २०२५ मध्ये वॉर २ रिलीज होणार असे जाहिर करण्यात आले आहे. (War 2 movie cast)