”माझे बाबा मला सोडून गेले तो काळ….” सखी गोखलेने सांगितला तिच्या आयुष्यातील ‘तो’ खास क्षण!
मराठी सिनेसृष्टीतील सखी गोखले आणि शुभांगी गोखले या मायलेकींची जोडी खास आई मुलीच्या जोडीमध्ये सामील होते. जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त पोस्ट शेअर केल्या आहेत. या दिवशी प्रत्येक जण आपल्या आईसाठी काही खास करण्याचा आणि तिच्यासाठी काहीतरी लिहिण्याचा प्रयन्त करत अभिनेत्री सखी गोखलेने हीने ही तिची आई आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. जी वाचून तुमचे डोळे नक्की पाणावतील.(Sakhi Gokhale)
सखी गोखले ने तिच्या आई शुभांगी गोखले बरोबरचा एक लहानपणीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिल आहे. ”झी’च्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनविलेला हा सुंदर चित्रपट पाठविला, तेव्हा लहानपणापासून माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन् तास खुर्चीवर खिळवून ठेऊ शकते. तिच्या गोष्टी कधी संपतच नाहीत. त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते. माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. पण या सर्वांतून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिला आहे. तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते. पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाबा मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता.
त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना अम्मा म्हणाली, “आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात, त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेलं असतं. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटतं, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो, त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे.” आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे, हे तिला कसं समजलं? तिने सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती, तर ती माझ्या मनाची घडण करत होती. ही घडण कशी झाली, त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादुगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल मी तुझे आभार मानते, अम्मा! आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”(Sakhi Gokhale)
==============================
हे देखील वाचा: Aai Kuthe Kay Karte मालिकेत अखेर वीणाची होणार एंट्री; ‘ही’ अभिनेत्री साकरणार भूमिका !
==============================
सखी फक्त 6 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी म्हणजेच प्रख्यात अभिनेते दिवंगत मोहन गोखले यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर शुभांगी यांनी सिंगल मदर राहत आपल्या मुलीचा सांभाळ केला. अवध्य लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्याने तेव्हापासूनच सखी साठी तिची आई म्हणजेच सर्वस्व आहे. त्यामुळे तय दोघींचा बॉन्ड किती खास आहे हे नेहमीच त्यांच्या फोटो आणि व्हिडीमधून दिसून येत.