Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

कुठल्या क्रिकेटपटूने सुपरस्टार राजेश खन्नाची विकेट घेतली???
राजेश खन्ना हिंदीतील मोठं नाव. नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून आपण त्यांचा अभिनय बघत आलो आहोत. सुपरस्टार राजेश खन्नालाही काही बाबतीत अपयशाचा सामना करावा लागला होता. त्याचीच ही एक अप्रचलित आठवण.
१९६९ ला ‘आराधना’ पासून राजेश खन्नाच्या सुपरस्टारपदाच युग चित्रपटात सुरू झालं आणि या चित्रपटातील त्याची नायिका शर्मिला टागोर हिच्याबरोबर, त्याची जोडी एकदम जमून गेली. ‘दाग’, ‘सफर’, ‘अमरप्रेम’, ‘मालिक’, ‘आविष्कार’, राजाराणी’, ‘त्याग’ या चित्रपटातील एक हिट जोडी. त्या दोघांच्या या हिट जोडीच्या काळात अंजू महेंद्र त्याची चांगली मैत्रीण होती. शर्मिला टागोरच्या काळात मुमताज, टिना मुनीम-अंबानी या दोघींशी त्याची जोडी चांगली जमली होती. अंजू महेंद्रशी मात्र त्याची जोडी तशी कधी जमलीच नाही. कारण एक नायिका म्हणून तिला शर्मिला, मुमताज, टिना यांच्या ऐवढी लोकप्रियता कधीच मिळवता आली नाही.
तरीही ती राजेश खन्नाची चांगली मैत्रीण होती. ही मैत्री सुपरस्टार पदाचं ग्लॅमर त्याच्याभोवती निर्माण झाल्यावर झालेली नव्हती. तो चित्रपटात येण्याआधी नाटकात भूमिका करत होता, तेव्हापासून जमलेली होती. ती त्याच्यातील नटाचं कौतुक करत त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करत होती. तिने निर्माण केलेल्या या आत्मविश्वासाचा आधार घेऊन तो रंगमंचावर नट म्हणून उभा राहिला. चित्रपटातील त्याच्या यशात अंजू त्याची नायिका बनली नाही.

१९६९ला त्याने मुमताजबरोबर नायकाची भूमिका केलेला एक चित्रपट आला होता ‘बंधन’. या चित्रपटात त्याच्याबरोबर तिने एक दुय्यम भूमिका केली होती. तेव्हा सर्वांना वाटत होत की त्याच्या सुरुवातीपासूनची मैत्रीण असल्यामुळे तो तिच्याशीच विवाह करणार. पण त्यावेळी निर्माण झालेली क्रिकेटची क्रेझ किंवा अन्य काही कारणाने हे जुळून आलं नाही. खरं तर ती राजेश खन्ना कोणीच नव्हता तेव्हापासून त्याच्यावर प्रेम करत असली, तरी तिच्या जीवनात तेव्हा आला एक क्रिकेटपट्टू गॅरी सोबर्स.
यामुळे ती व राजेश खन्ना यांच्यात अंतर निर्माण होत गेलं. हे अंतर म्हणजे राजेश खन्नाच्या तेव्हाच्या सुपरस्टारपदाची हार होती. एका क्रिकेटपटूनं केलेली हार ती त्याला स्वीकारावी लागली. त्यानंतर आपल्या सुपरस्टारपदाच्या काळात अशीच आणखी एक हार त्याला पत्करावी लागली. ‘आराधना’ नंतर शर्मिला टागोरशी त्याची जोडी कितीही जमली असली, तरी क्रिकेटपटू पतौडीशी विवाह करून ती मोकळी झाली.
एक सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना कितीही मोठा कलाकार असला तरीही याबाबतीत मात्र त्याला हारच पत्करावी लागली.