Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”;

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?

Bharat Jadhav : स्वातंत्र्यदिनी नाटक प्रेमींसाठी भरत जाधव घेऊन येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना काय वचन दिलं ?

 अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना काय वचन दिलं ?
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना काय वचन दिलं ?

by गणेश आचवाल 02/07/2020

एखादे गीत जसे संगीतकाराच्या किंवा गीतकाराच्या जीवनात यशाचं वेगळं वळण घेऊन येतं, तसेच एखादे गीत एखाद्या गायकाचेही नशीब घडवू शकते. जेव्हा ‘झेंडा’ चित्रपटाच्या शीर्षकगीताचा किस्सा समजेल, तेव्हा हे नक्कीच कळेल.

‘सा रे ग म प’ या झी मराठीवरील २००६-०७ मधील पर्वातून आपल्या लक्षात राहणारा गायक म्हणजे आळंदीचा ज्ञानेश्वर मेश्राम. आळंदीच्या वातावरणातील संस्कारातून घडलेले ज्ञानेश्वर मेश्राम आपल्या चांगलेच लक्षात राहतात. एकदा त्यांनी ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ ही रचना ‘सा रे ग म प’ मध्ये सादर केलं होतं. परीक्षक असणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मेश्राम यांचे खूप कौतुक केलं होतं. अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना मिठी मारली आणि त्यांना वचन दिलं, “मी यांच्यासाठी नक्कीच काहीतरी काम करणार.”

ज्ञानेश्वर मेश्राम

२०१० सालची गोष्ट असेल. एक दिवस ज्ञानेश्वर मेश्राम यांना फोन आला आणि तो फोन होता गायक, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्ते यांचा. ते म्हणाले की ते ‘झेंडा’ नावाचा एक चित्रपट करत आहे आणि त्याचे शीर्षकगीत मेश्राम यांनाच गायचे आहे. अवधूतने गाण्याचं स्क्रॅच रेकॉर्डिंग करून पाठवलं. जेव्हा अवधूतचा फोन आला, तेव्हा प्रथम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा विश्वासच बसला नव्हता. कारण मध्ये काही वर्षांचा काळ गेला होता. ज्ञानेश्वर मुंबईत आले, स्टुडिओत गेले. पण त्या आधुनिक स्टुडिओत सुरुवातीला मेश्राम थोडेसे गोंधळून गेले. त्या सगळ्या अत्याधुनिक यंत्र सामुग्री सोबत गीत गाणे त्यांना जमत नव्हते. थोडे रिटेक झाले आणि मेश्राम अवधूतना म्हणाले, “मला नाही जमणार हे.” त्यावेळी अवधूत गुप्ते ज्ञानेश्वर मेश्राम यांना म्हणाले, “विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? हे गीत तुमच्यासाठीच जन्माला आले आहे आणि माऊली, ते तुम्हालाच गायचे आहे. विठ्ठलाला साद घालणारा तो आर्ततेचा आवाज, तो पवित्र आवाज हा आळंदीच्या मातीतील संस्कार झालेल्या ज्ञानेश्वर मेश्राम अर्थात तुमचा आहे.” अवधूत गुप्ते यांनी दाखवलेला हा विश्वास मेश्राम यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. ज्ञानेश्वर माईकसमोर उभे राहिले. त्यांनी डोळे बंद केले, विठ्ठलाचे रूप डोळ्यांसमोर आणले, पांडुरंगाचे स्मरण केले आणि मग गाणे रेकॉर्ड झाले. तो दिवस सुद्धा एकादशीचा होता, हा एक महत्वाचा योगायोग ठरला.
ते शब्द अरविंद जगताप यांचे होते, तर संगीत अर्थातच अवधूत गुप्ते यांचे होते.

“जगण्याच्या वारीत, मिळेना वाट ही, साचले मोहाचे धुके घनदाट;
आपली माणसं, आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती;
विठ्ठला…. कोणता झेंडा घेऊ हाती ?”

हे शीर्षकगीत तुफान गाजले. अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना दिलेले वचन पाळले होते. या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा म टा सन्मान, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार आणि इंटरनॅशनल इंडियन म्युझिक अवॉर्ड असे अनेक पुरस्कार ज्ञानेश्वर मेश्राम यांना मिळाले. झी गौरव साठी सुद्धा त्यांना या गीतासाठी नामांकन मिळाले होते. या गाण्यामुळे आळंदीचे ज्ञानेश्वर मेश्राम यांना ठिकठिकाणी गायनासाठी आमंत्रणे आली. या गाण्याने त्यांना इतके यश दिले, की त्यांचे नवीन घर सुद्धा याच गाण्यामुळे आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे साकार झाले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Lyricist Marathi Movie Marathi songs music Music composer Singer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.