पुढच्या सिजनचा किंग ऑफ मिर्झापूर कोण? त्यागी का आणखीन कोण?
सध्या सगळीकडे एकाच शोची चर्चा आहे ती म्हणजे मिर्झापुरची! काही लोक त्या सिरिजला ओवररेटेड म्हणून हिणवत आहेत तर काही लोकं त्याविषयी भरभरून लिहीत आहेत! खरं बघायला गेलं तर ही सिरिज सगळ्याच लोकांच्या पसंतीस उतरली आहे असं म्हणता येणार नाही. कारण बऱ्याच लोकांना ह्या सिरिजच्या दुसऱ्या सीझन कडून बऱ्याच वेगळ्या अपेक्षा होत्या पण सीझन २ मध्ये मिर्झापुर ही फक्त मिर्झापुर एवढीच मर्यादित न राहत राज्याच्या राजकारणावर भाष्य करायला लागल्याने बरेच लोक नाराज झाले. सीझन २ मध्ये लोकांना अखंडानंद त्रिपाठी, मुन्ना त्रिपाठी आणि गुड्डू पंडित यांच्यातला संघर्ष बघायला मिळेल, पण दूसरा सीझन मध्ये या सोबतच ढीगभर पात्र जास्तीची घेतल्याने बऱ्याच जणांना हा सीझन बराचसा रटाळ वाटला. मिर्झापुरच्या ह्या सीझन मध्ये इतर पात्रांवर केलेला फोकस पाहून हे नक्की जाणवतं की या सिरिज मध्ये त्यांची गरज होतीच आणि पुढच्या सीझनचा बेस त्यांनी ह्या सीझन मध्ये तयार करून घेतला!
सीझन २ मध्ये बरीच लहान मोठी पात्र इंट्रड्यूस केली गेली, बरीच आधीची पात्र मोठी केली गेली. मुख्यमंत्र्याच्या भावच पात्र खूप वेगळ्याच पद्धतीने रंगवल गेलं. गुड्डू पंडित वर इलाज करणाऱ्या डॉक्टरच्या फॅमिलीचं एक वेगळच महत्व या सीझन मध्ये पाहायला मिळालं, मुख्यमंत्र्यांची विधवा मुलीला एक वेगळीच शेड दिली गेली, अत्यंत शांत आवाजात “ये भी ठीक है!” म्हणणाऱ्या रॉबिनचं पात्र सुद्धा वाटतं तितकं साधं सरळ नसून पुढच्या सीझन मध्ये ते पात्र सुद्धा काहीतरी ट्विस्ट आणणार आहे याची हिंट आपल्याला ह्या सीझन मध्ये मिळते. या सगळ्या कॅरक्टर बरोबरच आणखीन एक फॅमिली आणि त्यातली पात्रं अत्यंत अफलातून पद्धतीने डेवलप केली गेली. ती फॅमिली म्हणजे त्यागी फॅमिली आणि त्या त्यागी फॅमिली मधले मुख्य दद्दा त्यागी आणि त्यांची दोन मुलं भरत त्यागी आणि शत्रुघ्न त्यागी.
ही तीनही पात्र आणि त्यागी फॅमिली ज्या पद्धतीने सीझन २ मध्ये दाखवली गेली ते सुरुवातीला पाहताना काही लोकांना खूप असंबद्ध वाटली असतील, पण जेंव्हा बडे आणि छोटे यांचा जेंव्हा सस्पेन्स लोकांसमोर आला आणि त्यातल्या छोटे ने ज्या पद्धतीने त्याच्या वाहिनीला उल्लू बनवले तिथेच ही गोष्ट क्लियर झाली की ही फॅमिली आणि ही ३ पात्र पुढे जाऊन सगळंच चित्र बदलू शकतात आणि नेमकं तसंच झालं शेवटच्या पोस्ट क्रेडिट सीन मध्ये त्यांनी त्यागी फॅमिली पुढच्या सीझन मध्ये का असणार आहे याची एक हिंटच दिली आहे!
खासकरून बडे आणि छोटे त्यागी ही पात्र साकरणाऱ्या विजय वर्मा ने यामध्ये घेतलेली मेहनत आपल्याला स्क्रीनवर दिसून येते. शिवाय छोटे त्यागीचं सतत डावललं जाणं हे आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या सीझन मधल्या मुन्ना त्रिपाठीची आठवण करून देत. त्रिपाठी फॅमिली आणि त्यागी फॅमिली यांच्यात बरीच साम्य आहेत. दोन्ही कुटुंबात मुख्य कर्त्या माणसाला प्रचंड मान आहे, दोन्ही कुटुंबात काही विचित्र रहस्य दडलेली आहेत, दोन्ही कुटुंब अवैध व्यवसायात कार्यरत असून राजकारणाशी बराच संबंध आहे, आणि दोन्ही कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख या गादीवर विराजमान होण्यासाठी या कुटुंबातले तरुण संघर्ष करत आहेत. अजूनतरी त्यागी कुटुंब आणि त्रिपाठी कुटुंब यांच्यात तसं काहीच डायरेक्ट कनेक्शन नाहीये पण तिसऱ्या सीझन मध्ये ते कनेक्शन establish करण्यासाठी ही फॅमिली आणि त्यातली पात्र इतकी महत्वाची होती!
विजय वर्मा हा फार कमी काळात इतका वर आलेला एकमेव उत्तम नट आहे. शी, पिंक, बागी ३ सारख्या सिनेमातून सेकंड लिड भूमिका करणारा विजय वर्मा गली बॉय मधल्या मोईन मुळे एकदम चर्चेत आला, आणि आता मिर्झापुर सारख्या मोस्ट अवेटेड सिरिजच्या दुसऱ्या सीझन मध्ये इतकं भन्नाट पात्र करताना पाहिल्यावर एका गोष्टीचा आनंद होतो की टॅलेंटची कदर आजही आहे. पाहायला गेलं तर त्यागी हे पात्र तसं कुणीही साकारू शकलं असतं पण विजय वर्माचा ठेहराव, एक संयतपणा आणि त्याचं अभिनय कौशल्य यामुळे त्यागी हे पात्र मिर्झापुर मधलं मुख्य पात्र बनलंच शिवाय लोकांच्या सुद्धा ते पात्र आवडीचं झालं. मिर्झापुर सारख्या मोस्ट अवेटेड सिरिज मध्ये स्वतःची छाप पाडणाऱ्या विजय वर्माचा त्यागी सीझन ३ मध्ये आणखीन काय कमाल करतोय ते बघायला सगळेच उत्सुक आहेत!