Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) लेक दुआ हिच्या जन्मानंतर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे.. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये लागोपाठ ३ चित्रपटांमधून तिचा पत्ता कट झाल्याचं समोर येत आहे… दुआच्या जन्माआधी तिने सिंघम अगेन आणि ‘कल्की २८९८’ (Kalki 2898 AD) एडी हे दोन चित्रपट केले होते… आणि पुढे ‘कल्की २’ मध्येही दीपिकाचा महत्वाचा रोल असणार होता.. मात्र, आता कल्की २ मधून दीपिका पादूकोण हिची एक्झिट झाली असून प्रोडक्शन हाऊसने अधिकृतरित्या याबद्दल माहिती दिली आहे… (Bollywood News)

दरम्यान, ‘कल्की’ चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दीपिका यांच्या प्रमुख भूमिका होत्या… मात्र, दीपिका पुढच्या भागात नसल्याचं सांगत प्रोडक्शन हाऊसने सोशलल मिडियावर पोस्ट लिहिली आहे की, १८ सप्टेंबर रोजी विजयंती मूव्हीजने एक ट्विट करून घोषणा केली की, दीपिका पादुकोण ‘कल्की 2898 एडी’च्या दुसऱ्या भागाचा भाग असणार नाही. त्यांनी लिहिलं की, “आम्ही अधिकृतपणे घोषणा करत आहोत की दीपिका पादुकोण ‘कल्की 2898 एडी’ च्या सीक्वलचा भाग असणार नाही. खूप विचार-विनिमयानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याच्या प्रदीर्घ प्रवासानंतरही, आम्ही पार्टनरशीप करू शकलो नाही आणि ‘कल्की’ सारख्या चित्रपटाला कमिटमेंट आणि इतर गोष्टी योग्य वाटतात. आम्ही तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.” (Deepika Padukone will be not part of Kalki 2)

कल्कीच्या प्रोडक्शन हाऊसने ही माहिती दिल्यानंतर आता दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली आहे का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत… आधी संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून कामाच्या तासांवरुन दीपिकाने काढता पाय घेतला होता… त्यानंतर अमिताभ बच्चन आणि ती स्वत: प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ‘द इंटर्न’ (The Intern movie) चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून माघार घेतली; पण निर्माती म्हणून ती या प्रोजक्टमध्ये अजूनही आहे… आणि आता या दोन चित्रपटांनंतर ‘कल्की २’ मधून तिचा कट झालेला पत्ता नक्कीच तिच्या चाहत्यांच्या भूवय्या उंचावणारा आहे…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट
=================================
बरं, तीन चित्रपटांतून जरी दीपिका बाहेर पडली असली तरी आगामी काळात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या ‘किंग’ (King Movie) चित्रपटात पुन्हा ही जोडी दिसणार आहे… याशिवाय, दिग्दर्शक अॅटलीच्या साय-फाय चित्रपटात दीपिका अल्लू अर्जून (Allu Arjun) सोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचं सांगितलं जात आहे… आता जरी तिचे आगामी चित्रपट येत असले तरी ज्यावेळी ते रिलीज होतील आणि त्यात तिची भूमिका मोठ्या पडद्यावर दिसेल तेव्हाच तो चित्रपट म्हणावा लागेल अशी वेळ आली आहे… तसेच, अभिनयातून आता राम राम करत दीपिका आई आणि निर्माती या दोन भूमिका निभावणार का अशी चर्चा देखील सिनेवर्तृळात सुरु झाली आहे… आता यावर दीपिका पादूकोण काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Deepika Padukone movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi