Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं

Raj kapoor मध्यरात्री दोन वाजता गीतकार शैलेंद्र यांच्या घरी का पोहोचले?
आर के फिल्म्सच्या ‘बरसात’ या चित्रपटापासून त्यांची एक म्युझिकल टीम तयार झाली होती. संगीतकार शंकर जयकिशन, गायक मुकेश, लता मंगेशकर, गीतकार शैलेंद्र (Shailendra) आणि हसरत जयपुरी या टीमने नंतर पुढची वीस वर्ष रसिकांना अतिशय मेलडीअस गाणी दिली. आर के फिल्म्सच्या बरसात, आवारा, आह, श्री 420, जिस देश मे गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर…. या चित्रपटांमध्ये या म्युझिकल टीमने अतिशय सुंदर संगीत दिले. भावमधुर गाणी दिली. राजकपूर (Raj kapoor) (स्वत:च्या आर के शिवाय) बाहेरच्या चित्रपटात जेव्हा काम करायचे तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी हीच टीम त्याच्यासोबत असायची.

ऋषिकेश मुखर्जी यांनी १९५९ साली ‘अनाडी’ (anari) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमात राजकपूर, नूतन आणि ललिता पवार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट आर केचा जरी नसला तरी आर केचाच वाटावा तितका अप्रतिम बनला होता. या सिनेमातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर राजकपूर (Raj kapoor) रात्री दोन वाजता शैलेंद्र यांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता आणि त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडला होता. राजकपूर इतके इमोशनल का झाले होते? कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा ?
‘अनाडी’ या चित्रपटातील पाच गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती तर हसरत जयपुर यांनी दोन गाणी लिहिली होती. हसरत यांची ‘बनके पंछी गाये प्यार का तराना’ आणि ‘वो चांद खिला वो तारे हंसे’ ही गाणी लिहिली होती. तर शैलेंद्र यांनी ‘सब कुछ सिखा हमने’, ’किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार’, ’तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना’, ’नाइंटी फिफ्टी सिक्स’ आणि ‘दिल कि नजर से नजरो कि दिल से’ ही गाणी लिहिली होती. या चित्रपटातील ‘सबकुछ सीखा हमने ना सिखी होशियारी सच है दुनिया वालो के हम है अनाडी’ या गाण्याचा रेकॉर्डिंग होतं. (Bollywood mix masala)

शैलेंद्र यांनी अतिशय अप्रतिम असं गाणं लिहिलं होतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला राज कपूर स्वतः उपस्थित होते. शैलेंद्र मात्र काही कारणाने रेकॉर्डिंगला उपस्थित नव्हते. असं पहिल्यांदाच घडत होतं कारण गीतकार नेहमी रेकॉर्डिंगला उपस्थित असायचे. गाण्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं. मुकेश यांनी अतिशय सुंदर रीतीने गाणं गायलं. राज कपूर (Raj kapoor) यांना हे ना अतिशय आवडलं त्यांनी रेकॉर्डिंग झाल्यानंतर या गाण्याची एक कॉपी बनवून द्यायला सांगितली. नंतर ही कॉपी घेऊन ते घरी गेले आणि संध्याकाळ पासून ‘सबकुछ सीखा हमने ना सिखी होशियारी…’ हे गाणं ऐकत बसले. एकदा, दोनदा, तीनदा चारदा…. रात्री दोन वाजेपर्यंत ते हेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकत होते. त्यांना हे गाणं प्रचंड आवडलं होतं. या गाण्याने ते प्रचंड वेडावले.
शेवटी रात्री दोन वाजता ते उठले आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि थेट विलेपार्लेला गीतकार शैलेंद्र यांच्या घरी गाडी घ्यायला सांगितली. रात्री दोन वाजता राजकपूर (Raj kapoor) शैलेंद्र यांच्या घरी पोहोचले. दाराचे बेल वाजवली. नोकरांनी दार उघडले. एवढ्या रात्री राजकपूरला दारात पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले त्याने आत जाऊन शैलेंद्र उठवले. शैलेंद्रला देखील खूप आश्चर्य वाटले. ते उठले आणि त्यांनी राज कपूरला विचारलं, ”सबकुछ ठीक है ना ?” तेव्हा राज कपूर त्याच्याकडे फक्त पाहत बसले. (Untold stories)
===========
हे देखील वाचा : Dilwale Dulhania Le Jayenge मध्ये फाईट सीन टाकण्याची आयडीया कुणाची होती?
===========
शैलेंद्रला काहीच कळेना. राज कपूरने त्याल त्याला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागले. शैलेंद्र आणखीनच कन्फ्युज झाले. त्यांनी विचारले, ”सब खैरीयत है न… नेमकं काय झालं?” त्यावर राज कपूर म्हणाले, ”मेरे भाई क्या खूबसूरत गाना तुमने लिखा है. मैं श्याम से यही गाना सुन रहा हू.‘ सबकुछ सीखा हमने ना सिखी होशियारी…’, मुझे रहा नही गया इसलिये आधी रात मै तुझसे मिलने आया! मेरे दोस्त आज तुने कमाल कर दिया…”
‘अनाडी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला सुपर हिट झाला. या गाण्यासाठी गायक मुकेश, गीतकार शैलेंद्र , संगीतकार शंकर जयकिशन आणि अभिनेता राज कपूर (Raj kapoor) यांना फिल्मफेअर अवार्ड मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला रजत कमळ मिळाले.