छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

Khalid Ka Shivaji चित्रपटाला इतका विरोध का होतोय?
गेल्या १०-१५ वर्षात शिवकाळावर आधारित बरेच चित्रपट आले. पण त्यातील काही चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरित असल्याची कथा होती. उदा. मी ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘बघतोस काय मुजरा कर’ आदी. त्यातच आता आणखी एक असा चित्रपट आला आहे ज्याची चर्चा तर होतेय, पण त्याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. येत्या ८ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र आता त्याच्या प्रदर्शनावर टांगती तलवार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘खालिद का शिवाजी’ ! वऱ्हाडी भाषा, ग्रामीण जीवन आणि एका मुस्लीम पोराला असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड, असा एकंदरीत या चित्रपटाचा प्लॉट आहे.
राज मोरे दिग्दर्शित या चित्रपटाची निवड प्रतिष्ठीत अशा Cannes Film Festival मध्येही झाली होती. या फिल्म फेस्टिव्हलमधल्या ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी ‘खालिद का शिवाजी’ निवडला गेला होता. मात्र भारतात याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वादाची ठिणगी पेटली. तसं पहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व केवळ शिवभक्तच नाही तर इतिहासप्रेमींसाठीही भावनिक आणि संवेदनशील आहे. त्यांच्या इतिहासाची मोडतोड होऊ नये, यासाठी अनेक इतिहास संशोधक, अभ्यासक झटत असतात. पण ‘खालिद का शिवाजी’ मध्ये असे काही संवाद आहेत, ज्यामुळे इतिहासप्रेमी नाराजदेखील झाले आणि तितकाच रोष त्यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. काहींना ट्रेलर आवडला तर काहींनी यावर आक्षेप घेतला. आक्षेप घेण्याचं कारण म्हणजे चित्रपटातील संवाद ! या चित्रपटात काही डायलॉग्स आहेत, त्यात असं म्हटलं आहे की, “छत्रपती शिवरायांच्या सैन्यांमध्ये ३५ % सैन्य हे मुसलमान होते, त्यांचे ११ बॉडीगार्ड हेसुद्धा मुस्लीम होते, त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती’ ! या संवादामुळे इतिहासप्रेमींचा भडका उडाला असून या गोष्टींमध्ये कुठेही तथ्य नाही, तसेच याचा कोणताही समकालीन पुरावा किंवा संदर्भ नाही, असं इतिहास अभ्यासाकांचं म्हणणं आहे. तर कोणत्या पुराव्याच्या आधारे हे संवाद या चित्रपटात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अनेक इतिहास अभ्यासक, संघटना आणि शिवभक्तांनी यामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच काही संघटनांनी समकालीन व ऐतिहासिक पुरावे सादर केल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. हिंदू महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेत त्यांनी सेन्सॉर बोर्डालाही पत्र लिहिलं आहे. तसेच मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका, असं आवाहन केलं. त्यामुळे चित्रपटाचा वाद आता मुख्यमंत्री आणि केंद्रापर्यंत पोहोचला आहे.
================================
=================================
दरम्यान राज मोरे दिग्दर्शित आणि कैलास वाघमारे लिखित या चीत्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, स्वतः कैलास वाघमारे, सुषमा देशपांडे, स्नेहलता तागडे आणि क्रिश मोरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. आता सेन्सर बोर्ड चित्रपटाच्या प्रदर्शनावर काय निर्णय घेतोय, हे महत्त्वाचं ठरणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi