Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Rajesh Khanna आणि सायरा बानो हे दोन समकालीन कलाकार का एकत्र येऊ शकले नाही?
सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्या काळातील सर्व नायिकांसोबत भूमिका केल्या समकालीन नायिकांसोबत (रेखा, मुमताज, मौसमी, झीनत, परवीन) तर भूमिका केल्याच केल्या. त्यांच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे, टीना मुनीम यांच्या सोबत देखील ते चमकले. पण त्यांना सीनियर असलेल्या शर्मिला टागोर, आशा पारेख, नंदा यांच्यासोबत देखील रुपेरी पडल्यावर नायक म्हणून राजेश खन्ना चमकले. असे असतानाही राजेश खन्ना आणि सायराबानो हे दोन समकालीन कलाकार मात्र कोणत्याही चित्रपटात एकत्र आलेले दिसले नाहीत. हे असे का घडले? दोघांमध्ये काही नाराजी नाट्य झाले होते का? की कोणी निर्मात्याने या दोघांना एकत्र साइनच केले नाही? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. कारण खरंतर हे दोन कलाकार दोन चित्रपटात एकत्र आले असते पण दुर्दैवाने हा योग जुळून आला नाही.

अभिनेत्री सायरा बानो यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना बद्दल खूप चांगले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले,” राजेश खन्नाला माझ्या भूमिकांबद्दल कायम आदर असायचा. ते कायम माझ्या चित्रपटातील कामाबद्दल बोलत असायचे. मला देखील राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा ऑरा पाहायला मिळाला होता.” राजेश खन्ना आणि सायरा बानो खरंतर ‘छोटी बहू’ या चित्रपटात एकत्र काम करणार होते. दादरच्या रूपतारा स्टुडिओमध्ये या सिनेमाचा मुहूर्त देखील दणक्यात झाला होता. या मुहूर्ताच्या शॉट ला हे दोघे चहा पिताना दाखवले होते. राजेश खन्ना यांनी हा शॉट आणखी इम्प्रेसीव्ह करण्यासाठी एकाच बशीत ओतलेला चहा दोघे दोन्ही बाजूने पिताना असा शॉट घेतला होता. त्यामुळे सिनेमातील जॉनर
आणखी कळून आला होता. या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले.
================================
हे देखील वाचा: Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे
=================================
दोन दिवस या दोघांनी एकत्र काम देखील केले. पण त्यानंतर सायरा बानो यांची तब्येत अचानक बिघडली. कोलाइटिस या आजाराने त्यांना थेट परदेशात उपचारासाठी जावे लागले. उपचार लांबल्यामुळे शेवटी दिग्दर्शक के बी तिलक यांनी सायरा बानो च्या ऐवजी या चित्रपटात शर्मिला टागोर यांना घेतले आणि राजेश शर्मिलाचा ‘छोटी बहू’ हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला. ज्येष्ठ बंगाली साहित्यिक शरदचंद्र मुखोपाध्याय तथा शरद बाबू यांच्या साहित्यावर छोटी बहु हा चित्रपट बेतला होता. टिपिकल फॅमिली ड्रामा होता सिनेमा हीरोइन ओरिएंटेड होता त्यामुळे सायरा बानो ला यामध्ये खूप चांगला वाव मिळाला असता. या चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंद जी यांनी दिले होते.

यातील ‘हे रे कन्हैया किसको कहेगा तो मैया हे’ किशोर कुमार यांनी गायलेले गाणे त्या काळात खूप गाजलं होतं. राजेश खन्ना शर्मिला टागोर आणि शशिकला यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. याच काळात राजेश खन्ना आणि सायरा बानू यांना गुरुदत्त यांचे बंधू आत्माराम यांनी त्यांच्या ‘रेशम की डोरी’ या चित्रपटासाठी साईन केले होते. परंतु पुन्हा सायराचे आजारपण आणि सुपरस्टार राजेश खन्ना याचे बिझी असणे यामुळे या चित्रपटातून राजेश खन्ना बाहेर पडला तिथे धर्मेंद्रची वर्णी लागली.
================================
हे देखील वाचा: दिलीपकुमारला पहिल्यांदा पाहिल्यावर सायरा बानू का किंचाळली होती?
=================================
धर्मेंद्रवर या सिनेमाची काही रिळे शूट देखील झाली. लंडन हून जेव्हा सायरा बानो भारतात आली त्यावेळेला तिला राजेश खन्नाच्या जागी धर्मेंद्रला रिप्लेस केलेले दिसले. अशा पद्धतीने या चित्रपटात धर्मेंद्रची नायिका सायरा बानू बनली. छोटी बहु आणि रेशम की डोरी हे दोन्ही चित्रपट खरंतर राजेश आणि सायरा यांना एकत्र घेऊन साइन केले गेले होते. पण या दोघांना एकत्र काम करण्याचा योग नव्हता त्यामुळे हे दोन चित्रपट हे दोघे एकत्र कधीच येऊ शकले नाही. पुन्हा भविष्यात हे कधीच एकत्र आले नाहीत.