Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

‘पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा’, Vicky Kaushal कडून ‘या’ मराठी नाटकाचं कौतुक !
सध्या मराठी रंगभूमीवर चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. विविध नाट्यगृहांच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’च्या पाट्या झळकताना पाहायला मिळत आहेत. ‘संगीत देवबाभळी’सारखं नाटक रंगभूमीवर भरघोस प्रतिसाद मिळवतंय, तर ‘सखाराम बाइंडर’ हे गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रसिकांसमोर सादर होण्यासाठी सज्ज आहे. अशा पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच धाटणीच्या नाटकाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे ते नाटक म्हणजे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ (Shivaji underground in bhimnagar mohalla) . हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर खूपच लोकप्रिय ठरत आहे आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या नाटकाचं वेगळेपण आणि ताकद इतकी आहे की, बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलने देखील त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलने मराठीतून संवाद साधत या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत.(Vicky Kaushal)

सध्या सोशल मीडियावर विक्कीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “नमस्कार! मी विकी कौशल… ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं काम, मेहनत आणि प्रयत्न हे सगळं खूप प्रेरणादायी आहे, विशेषतः आपल्या महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा हेतू. पुढचे सगळे प्रयोग हाऊसफुल्ल व्हावेत हीच सदिच्छा. जय भवानी, जय शिवराय!”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या विचारांची व्याप्ती दाखवणारं हे नाटक वेगळी दिशा दाखवतं. महाराजांचा लढा कुठल्याही एका जातीसाठी नव्हता, तर सर्व कष्टकरी, सामान्य जनतेसाठी होता. हे वास्तव प्रभावीपणे या नाटकातून साकारलं गेलं आहे. म्हणूनच हे नाटक केवळ मनोरंजन न करता डोळस विचारही देतं.(Vicky Kaushal)
=============================
हे देखील वाचा: Zee Marathi ची लोकप्रिय मालिका संपणार? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने चर्चांना उधाण…
=============================
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक काही नवीन नाही. काही वर्षांपूर्वी याचे प्रयोग रंगभूमीवर आले होते, मात्र काही कारणांनी ते थांबवावं लागलं. आता मात्र हे नाटक पुन्हा एकदा नव्या जोमात रंगमंचावर परतलं आहे. राजकुमार तांगडे यांनी याचे लेखन केलं असून, दिग्दर्शनाची जबाबदारी कैलाश वाघमारे आणि संभाजी तांगडे यांनी सांभाळली आहे. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून हे नाटक साकारलं गेलं असून, त्यांनीच यातील गीते आणि संगीताची जबाबदारीही पार पाडली आहे. सध्या हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.