Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम भाग्याचं
एका वर्षापूर्वी ‘मिर्जापूर’ वेबसिरीज रिलीज झाली आणि ती चांगलीच धमाकेदार ठरली, पहिल्या सीजननंतर लोक उत्सुकतेने दुसऱ्या सीजनची वाट पाहत आहे. पहिल्या सिजनच्या आठवणी सांगतात अनंगशाने पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्यासोबत कामाचा अनुभव खूप छान होता असं ती सांगते. पंकज सर एक नम्र, साधे आणि कष्टकरी माणूस आहे, त्यांना स्वतःबद्दल जरा पण गर्व नाही त्यामुळे काम करायला अधिक मज्जा येत असल्याचं ती म्हणाली. त्यांच्या बरोबर काम करायला मिळाले हे माझे स्वभाग्य आहे असं तिने सांगितलं. उपलब्ध माहितीप्रमाणे मिर्झापूरच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिजनचे काम संपवलं आहे पण तारीख अजून ठरलेली नाही.
अनंगशाने मिर्झापूरच्या शूटिंगदरम्यान तिच्या सह कलाकारांबद्दल काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत. या सिरीजआधीच अलीला मी माझ्या थिएटरच्या काळापासून ओळखत आहे असं ती म्हणाली. तो खूपच प्रतिभाशाली अभिनता आहे, आणि प्रयोग करण्यापासून घाबरत नाही आणि खरोखर छान माणूस आहे अशा शब्दात ती अलीच कौतुक करते. मिर्झापूर व्यतिरिक्त अनंगशा बिस्वास बहुप्रतीक्षित वेबसिरीज होस्टगेज 2 मध्ये सुद्धा काम केले आहे.

कोविड -१९ साथीमुळे सर्व देशभरात लॉकडाऊन आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की करमणूक उद्योग आणि इतर उद्योगांचे कार्य थांबले आहे. सेलिब्रेटी आणि सामान्य लोक घरी थांबून सरकारचे नियम पळत आहेत व जी लोक नियम पळत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेथे सोशल मीडियावर जनजागृती केली असून लोकांना घरी राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे.