Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

जगातला एकमेव ‘शापित’ सिनेमा, ज्याने घेतला १०० हून अधिक लोकांचा जीव
मुंबई अंडरवर्ल्ड आणि गँगवॉर यावर बेतलेले मास्टरपीस चित्रपट देणाऱ्या राम गोपाल वर्मा या दिग्दर्शकाचा एकेकाळी हॉरर चित्रपटांमध्येही हातखंडा होता. गेली बरीच वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून कोसो दूर असलेल्या राम गोपाल वर्माने एकाहून एक सरस असे हॉरर चित्रपट दिले आहेत. त्याने केलेले ‘भूत’, ‘कौन’, ‘डरना मना है’सारख्या चित्रपटांची नावं जरी काढली तरी कित्येकांना फेफरं भरतं.
याच रामुने मात्र २००८ साली आलेल्या ‘फुंक’ या त्याच्या हॉरर चित्रपटावेळी एक अत्यंत बाळबोध विधान केलं होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी रामु आणि निर्मात्यांनी लोकांना हा चित्रपट एकट्याने बघायचं चॅलेंज दिलं.
रामुच्या करियरला तोवर उतरती कळा लागली होती. ‘सरकार राज’सारखा अॅवरेज सिनेमानंतर त्याने सलग तीन चित्रपट फ्लॉप दिले होते. त्यात ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘डार्लिंग’ आणि ‘कॉंट्रॅक्ट’सारखे तद्दन टुकार चित्रपट सामील होते. रामुच्या मते ‘फुंक’ हा आजवरचा सर्वात भयानक चित्रपट आहे जो लोकांनी एकट्याने पहावा. प्रेक्षकांनी मात्र रामुच हे आव्हान मनावर घेतलं. मोजक्या काही लोकांनी एकट्याने हा चित्रपट पाहिला अन् त्यांना काहीच यात भयावह वाटलं नसल्याचं सांगितलं. या चित्रपटात किच्चा सुदीप, अमृता खानविलकर हे प्रमुख भूमिकेत होते, पण रामुचा हा ‘फुंक’ जबरदस्त फ्लॉप ठरला.

पण आज नेमकं रामुने दिलेल्या या चॅलेंजबद्दल सांगण्यामागचं कारणही तितकंच मजेशीर आहे. थ्रिलर असो की भयपट शेवटी ती एक काल्पनिक गोष्ट असते अन् त्याकडे लोकांनीही त्याच दृष्टिकोनातून पाहायचं असतं. मग कोणत्या दिग्दर्शकाने चॅलेंज देओ अथवा न् देओ. पण तुम्हाला आज आम्ही अशा एका हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो पाहताना बऱ्याच लोकांनी त्यांचा जीव गामावल्याचं सांगितलं जातं. ‘शापित चित्रपट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिनेमाने तब्बल १०० लोकांचा जीव घेतला असल्याचं सांगितलं जातं.
===
हेदेखील वाचा : हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिला युध्दपट
===
‘एंट्रम’ (Antrum: The Deadliest Film Ever Made) हा एक शापित चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची सुरुवात एका मिनी-मॉक्यूमेंट्रीने होते. एका जंगलात फिरणाऱ्या भावा-बहिणीच्या भोवती याचं कथानक फिरतं. १९७९ साली एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट अत्यंत रहस्यमयी पद्धतीने दाखवण्यात आला होता अन् हा चित्रपट पाहून कित्येकांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला होता. चित्रपट इतिहासातील हा अत्यंत घातक असा चित्रपट मानला जातो.

‘एंट्रम: द डेडलीएस्ट फिल्म एवर मेड’ (Antrum: The Deadliest Film Ever Made) हा चित्रपट १९७९ मध्ये सर्वप्रथम एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आणि त्यानंतर याच्यावर लगेच बंदी घालण्यात आली. हा चित्रपट कसा बनला हेदेखील एक न सुटलेलं कोडंच आहे. हा चित्रपट अमेरिकेत कधीच मोठ्या पडद्यावर दाखवला गेला नाही, व्हिडिओ ऑन डिमांड या सुविधेच्या माध्यमातूनच हा चित्रपट दाखवला जात असे.
त्यानंतर १९८८ साली हंगेरीमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जेव्हा याचं स्क्रीनिंग सुरू होतं तेव्हाच नेमकी त्या इमारतीमध्ये भीषण आग लागली. सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात सर्वप्रथम आग ही प्रोजेक्टर रूममध्ये लागते पण यावेळी मात्र तिथे आग लागलेलीच नव्हती. चित्रपटगृहाचे दरवाजेही बंद असल्याने आतमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आणि चेंगरा चेंगरीमध्ये काही लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे (Antrum: The Deadliest Film Ever Made) रिळ मात्र सुरक्षित होते.

यानंतर १९९३ मध्ये पुन्हा एकदा या चित्रपटाचं स्क्रीनिंग करण्यात आलं आणि यावेळीसुद्धा ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला त्यांना चित्र-विचित्र गोष्टी दिसू लागल्या आणि भास व्हायला लागले आणि अशाच परिस्थितीत बऱ्याच लोकांनी त्यांचा जीव गमावला. हा चित्रपट नेमका का काढण्यात आला होता? यामागे नेमकं कोण होतं? या चित्रपटामुळे झालेले मृत्यू नैसर्गिक होते की त्यामागे काही घातपाताचा हेतू होता? अशा बऱ्याच गोष्टींची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत.
आयएमडीबी या साईटवर मात्र काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळतं. ज्यांना ज्यांना हा चित्रपट पाहायची संधी मिळाली त्यांनी ‘आयएमडीबी’ या साईटवर जाऊन हा चित्रपट (Antrum: The Deadliest Film Ever Made) म्हणजे एक गीमिक असल्याचं नमूद केलं आहे. बऱ्याच लोकांच्या मते या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत, पण हा चित्रपट खरंच ‘शापित’ आहे की हे फक्त मार्केटिंग गीमिक आहे हे कोडं अजूनही कायमच आहे.