Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kishore Kumar यांनी रेकोर्डिंग स्टुडिओत गाढव आणायला कां सांगितले?

Kokan Hearted Girl : “ते लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत?”,

Airplane Crash : ‘या’ २ कलाकारांनीही विमान दुर्घटनेत गमावला होता

Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड कलाकारांचे रिलेशनशिप्स आणि….

Shah Rukh Khan याच्या जोश चित्रपटाला २५ वर्ष पुर्ण!

The Bengal Files: काश्मिरने रडवले आता बंगाल फाईल्स घाबरवणार!

‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’, Avdhut Gupte  यांचं ‘सांग आई’ गाणं झालं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलिवूडचं Spy Universe!

 बॉलिवूडचं Spy Universe!
कलाकृती विशेष

बॉलिवूडचं Spy Universe!

by रसिका शिंदे-पॉल 12/06/2025

कोणत्या Genere मधले चित्रपट तुम्हाला पाहायला आवडतात असं विचारलं तर साहजिकच ह़ॉरर, कॉमेडी, थ्रिलर आणि अॅक्शन अशीच उत्तर मिळतील… पण यात Spy चित्रपट (Spy Universe Movies) पाहणारा एक खास ऑडियन्सही आहे.. खरं तर चित्रपटांच युनिवर्स असणं ही संकल्पना हॉलिवूडमधून बॉलिवूड आणि साऊथकडे गेली… यशराज फिल्म्सने स्पाय युनिवर्स तयार केलं आणि ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) चित्रपटापासून त्यांचा सुरु झालेला प्रवास ‘वॉर २’ (War 2) पर्यंत आलाय.. जाणून घेऊयात बॉलिवूडच्या स्पाय युनिवर्सबद्दल…(Yashraj Films Spy Universe)

बॉलिवूडच्या स्पाय युनिवर्समध्ये डीप डाईव्ह मारण्यापूर्वी नेमकं स्पाय चित्रपट आहेत तरी काय? तर प्रत्येक देशाचे काही गुप्तचर म्हणजेच स्पाय असतात आणि आपल्या देशाचं सर्वच स्तरांवर रक्षण करण्यासाठी जसं सैनिक आपलं काम चोख बजावताततसंचं हे स्पाय देखील काम करत असतात…यात रॉ एजंट्स किंवा स्पाय कामं कशी करतात? त्यांचं ट्रेनिंग कसं असतं? देशाचं संरक्षण ही एकच बाब त्यांच्या मनात कशी बिंबवली जाते हे सारं काही सिनेमॅटिक पद्धतीने चित्रपटांमध्ये दाखवतात… आता वळूयात मुळ मुद्द्याकडे… स्पाय चित्रपट बॉलिवूडमध्ये फार आधीपासून येत होते आणि आताही येतात.. तसं पाहायला गेलं तर १९९९ मध्ये आलेला ‘सरफरोश’ (Sarfarosh Movie) हा चित्रपट हिंदीतला पहिला स्पाय चित्रपट होता असं म्हटलं जातं.. त्यानंतर ‘राझी’, ‘फायटर’, ‘एजंट विनोद’, असे अनेक स्पाय मुव्हीज आले.. पण यशराज फिल्म्सने हॉलिवूडसारखं स्पाय युनिवर्स बॉलिवूडमध्ये निर्माण केलं… (Bollywood News)

Spy Universe ची सुरुवात केली सलमान खानच्या (Salman Khan) ‘एक था टायगर’ या चित्रपटापासून…२०१२ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडची कथा सांगण्याची आणि मांडण्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली .. त्यानंतर २०१९ मध्ये ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफचा ‘वॉर’ चित्रपट आला.. पुढे २०२३ मध्ये याच स्पाय युनिवर्सचे दोन बिग बजेट चित्रपट आले.. खरं तर याच दोन चित्रपटांनी २०२३ या वर्षाची सुरुवात आणि शेवट केला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. २०२३ च्या जानेवारीत दीपिका पादूकोण आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ (Pathan) आला आणि त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सलमान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ (Tiger 3 Movie) आला.. सर्वसाधारणपणे हिंदी चित्रपटांना एका गोष्टीत फार टोचलं जातं ते म्हणजे हिंदीतील सीक्वेल्समध्ये connectivity नसते.. पण यशराज फिल्म्सने स्पाय युनिवर्स तयार करताना interconnectivity चा फार गंभीरपणे विचार केला असून प्रत्येक चित्रपटाचं interconnection दाखवलंय…(Entertainment)

या स्पाय युनिवर्सला ग्लोबली यश मिळण्यासाठी दोन चेहरे फार महत्वाचे ठरले ते म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान.. या दोघांची प्रसिद्धी जगभरात असल्यामुळे भारतीय चित्रपटसृ्ष्टीतही स्पाय युनिवर्स तयार करुन एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग केला जातोय हे जागतिक स्तरापर्यंत पोहोचलं आणि सिद्ध ही झालं… आता यात दीपिका पादूकोण आणि कॅटरिना कैफ यांचाही महत्वाचा वाटा आहे हे डावलून चालणार नाहीच.. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाकूयात..’एक था टायगर’ चित्रपटाने 198.75 कोटी कमावले होते… तर war चित्रपटाने 318.01 कोटी, पठाणने 543.09 कोटी आणि टायगर ३ ने 336.25 कोटी कमावले होते… त्यामुळे एकट्या यशराज फिल्म्लच्या स्पाय युनिवर्सने हजार कोटींच्या घरात अख्ख्या बॉलिवूडला कलेक्शन करुन दिलंय…(Spy Universe Box office collection)

या स्पाय युनिवर्समध्ये जसे Male lead actors गाजले तशाच फिमेल स्पाय (FEmale Spy) देखील विशेष लक्षात राहिल्या आणि त्याचमुळे यशराज पहिल्यांदाच female spy चित्रपट या युनिवर्समध्ये घेऊन येणार आहे.. ‘अल्फा’ (Alpha Movie) असं या चित्रपटाचं नाव असून यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ झळकणार आहेत.. महत्वाचं म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खानचा Tiger vs Pathan हा चित्रपट येणार होता खरा पण एका मुलाखतीमध्ये सलमानने सध्या तरी हा चित्रपट Hold वर असल्याचं सांगितलंय… आता बॉलिवूडच्या २ मेगास्टार्सचा हा चित्रपट येणार ही नाही याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नाही… (Bollywood Masala)

================================

हे देखील वाचा: Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापटावर आधारित चित्रपट इतिहास रचणार?

=================================

आता यशराजचा आणखी एक स्पाय चित्रपट ‘वॉर २’ येत्या १४ ऑगस्टला रिलीज होणार आहे… विशेष म्हणजे या स्पाय चित्रपटातून Jr NTR Bollywood मध्ये debut करणार आहे.. हिंदी आणि साऊथ मधले दोन लोकप्रिय चेहरे म्हणजे ह्रतिक रोशन आणि Jr NTR या चित्रपटात एकत्र दिसणार असल्यामुळे नॉर्थ आणि साऊथच्या प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट अधिक ताकदीने पोहोचणार आहे.. कारण आपल्या भाषेतील फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा अभिनेता ज्यावेळी दुसऱा भाषेतील चित्रपटात काम करतो त्यावेळी साहजिकच त्याचे चाहते तो चित्रपट पाहतात आणि ही एक Human Psychology आहे.. त्यामुळे नॉर्थ आणि साऊथचं फिल्म मार्केट वॉर २ खाऊन टाकणार असं म्हणण्यास काहीच हरकत नाहीये..

इतकंच नाही तर ह्रतिकचा वॉर २ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमवू शकेल असा अंदाजही वर्तवला जातोय.. त्यामुळे यशराज फिल्म्सच्या या स्पाय युनिवर्सचा हा सहावा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडणार.. हे आता लवकरच कळेल…शिवाय आता स्पाय युनिवर्समध्ये विकी कौशलचीही (Vikcy Kaushal) एन्ट्री होणार असं सांगितलं जातंय… बायकोच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाने सुरुवांत केलेल्या स्पाय युनिवर्समध्ये विकीची एन्ट्री काय धमाल आणणार हे पाहायला हवं…(Vicky Kaushal And Yashraj Films)

रसिका शिंदे-पॉल

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Deepika Padukone Entertainment hrithik roshan Jr ntr Katrina kaif salman khan shah Rukh Khan spy universe movies in bollywood Vicky Kaushal yashraj film spy universe yashraj films
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.