Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Year Ender : २०२४ वर्षात ‘या’ लोकप्रिय जोड्या झाल्या विभक्त
जिथे २०२४ मध्ये अनेक कलाकारांनी नवीन नाती जोडत आयुष्याची नव्याने सुरुवात केली. तिथे दुसरीकडे मात्र अनेक प्रसिद्ध कलाकारांनी यावर्षी आपल्या जोडीदाराची कायमची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. २०२४ सालात अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडयांनी घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. चला जाणून घेऊया या जोड्यांबद्दल. (Year Ender)
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक
२०२४ वर्षाच्या सुरुवातीलाच भारताची लोकप्रिय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी घटस्फोटाची माहिती दिली. सानिया आणि शोएब मागील २ वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांनी जानेवारीमध्ये घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली होती. (Bollywood Masala)
ईशा देओल आणि भरत तख्तानी
ईशा देओलने उद्योजक भरत तख्तानी यांच्याशी विवाह केला होता. मात्र, आता ते वेगळे झाले आहे. या दोघांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये घटस्फोटाची बातमी दिली. लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. (Entertainment mix masala)
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोव्हिक
२०२४ सालातील सर्वात चर्चित घटस्फोट म्हणून या दोघांचा घटस्फोट ओळखला गेला. हार्दिक आणि नताशाने जुलैमध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. हार्दिक पांड्या आणि नताशाने जानेवारी २०२० एंगेजमेंट केली होती. या निमित्त त्यांनी जंगी पार्टी दिली होती. त्यानंतर त्यांनी मे २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. विवाहानंतर त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. (Ankahi Baatein)
धनुष आणि ऐश्वर्या
रजनीकांत तमिळ सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेतला आहे. २००४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. २० वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. (Bollywood Tadka)
सायरा बानो आणि ए आर रहमान
जागतिक कीर्तीचे संगीतकार आणि गायक ए आर रहमान यांनी नोव्हेंबरमध्ये ते घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. लग्नाच्या २९ वर्षांनंतर ए आर रेहमान आणि पत्नी सायरा बानू (A. R. Rehman and Saira Bano) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ए आर रेहमान यांनी खुद्द सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली होती.
दलजीत कौर आणि निखिल पटेल
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलजीत कौरने तिच्या नवऱ्यापासून निखिल पटेलपासून घटस्फोट घेतला आहे. सध्या ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.