‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Zeenat Aman : ऐसे ना मुझे तुम देखो…’या रोमँटिक गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
पूर्वीच्या काळी गाणी बनण्याची प्रक्रिया खूप मनोरंजक असायची. अशाच एका रोमँटिक गाण्याने गेली पन्नास वर्ष रसिकांना रिझवले आहे. हे गाणं देखील अशाच एका छोट्या चर्चेतून तयार झाले होते. कुणाच्या ध्यानी मनी नव्हते या छोट्या गप्पांतून इतके मस्त रोमँटिक गाणे बनले. कोणतं होतं ते गाणं आणि काय होतं तो नेमका किस्सा? (Bollywood Retro News)

अभिनेत्री झीनत अमानच्या मधाळ नजरेकडे पाहत गीतकाराने दोन ओळी लिहून काढल्या आणि याच दोन ओळींतून एक रोमँटिक गाण्याचा जन्म झाला होता! हा प्रसंग घडला होता देव आनंद आणि झीनत अमान यांच्या एका चित्रपटाच्या गाण्याच्या सेटिंगच्या वेळी. हा चित्रपट होता गुल आनंद दिग्दर्शित १९७७ साली प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग डार्लिंग’. हा देव आनंद आणि झीनत अमान यांचा सहावा आणि शेवटचा चित्रपट होता. झीनत मान बॉलीवूडमध्ये सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला आली आणि तिची सेंसेशन एन्ट्री झाली देव आनंदच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटापासून. यातील तिच्यावर चित्रित ‘दम मारो दम’ या गाण्याने भारतभर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात देव आनंद आणि झीनत यांनी बहीण भावाचा रोल जरी केला असला तरी नंतर मात्र झीनत त्याची नायिका म्हणून बऱ्याच चित्रपटात दिसली. (Bollywood News)

‘हिरा पन्ना’, ‘वॉरंट’ आणि ‘डार्लिंग डार्लिंग’. गुल आनंद दिग्दर्शित ‘डार्लिंग डार्लिंग’ या चित्रपटाची कास्टिंग आणि सुरुवात १९७३ साली झाली. पण नंतर दोन्ही कलाकारांच्या व्यस्त शेड्युलमुळे हा चित्रपट लांबत गेला आणि थेट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची म्युझिक सीटिंगची एक मीटिंग चित्रपटाचे संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी, देवआनंद, झीनत अमान आणि म्युझीशियंसन यांच्यात झाली होती. या मिटीगला यायला देव आनंद यांना उशीर झाल्यामुळे त्यांनी इतरांना तुम्ही चर्चा सुरू करा आणि गाण्याच्या जागा फिक्स करा अशा सूचना दिल्या. त्यावर संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी चर्चा करू लागले. अभिनेत्री झीनत हा सर्व माहोल आपल्या मधाळ नजरेने पाहत होती. (Dev Anand Movies)
================================
हे देखील वाचा: Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!
=================================
झीनत तेव्हा भलतीच चार्मफुल दिसत होती. आर डी बर्मन यांचे लक्ष सारखे झीनतकडे जात होते. ती त्यावेळी प्रचंड ब्युटीफूल दिसत होती आणि तिच्या नजरेमध्ये मोठी मादकता होती. संगीतकार आर डी बर्मन म्हणाले की, “झीनतजी तुमच्या डोळ्यातील मदहोशी कुणाला देखील तुमच्या प्रेमात पाडू शकते!” त्यावर झीनत ओठाचा चंबू करून जानलेवा दिलखुलास हसली. मग आर डी बर्मन म्हणाले,” माझ्याकडे नको. आनंद बक्षीकडे बघा. तुमची ही मादक मदहोशी नजर पाहून त्यांच्यातील कवी आज नक्की जागा होईल!” झीनतने मग आनंद बक्षींना तसाच किलिंग लुक दिला. आनंद बक्षी तिची नजर पाहून हसले आणि म्हणाले, “ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा…” त्यावर सर्वजण जोरात हसले. त्याच वेळेला दारात देवानंद देखील आले नंतर इतर चर्चा सुरू झाली. या गडबडीत आनंद बक्षी यांनी म्हटलेल्या दोन ओळी ते विसरून पण गेले. (Bollywood Romantic Songs)

मात्र, आर डी बर्मन यांनी त्या ओळी लिहून ठेवल्या. त्यांना त्या खूप आवडल्या होत्या. संध्याकाळी घरी जाताना त्यांच्या डोक्यात त्याच ओळी घुमत होत्या. त्यांनी घरी गेल्यानंतर आपल्या गिटार वर या ओळींवर एक ट्यून तयार केली आणि त्यात या दोन ओळी गुंफल्या. ही ट्यून त्यांना भलतीच आवडली मोठी रोमँटिक धून झाली होती. दुसऱ्या दिवशी ते धून घेऊन आनंद बक्षी यांच्याकडे गेले आणि म्हणाले “आता यावर गाणं लिहा मुखडा तुम्ही कालच सांगितलं होता”. आनंद बक्षी म्हणाले ,”मी कधी मुखडा सांगितलं होता?”. त्यावर आनंद बक्षी यांनी कालच्या प्रसंगाची आठवण करून आवडली. देव आनंदला ती धून प्रचंड आवडली. आणि त्याने ताबडतोब आणून बक्षी यांना त्यावर एक रोमँटिक गाणे लिहायला सांगितले. तिथल्या तिथे स्टुडिओमध्ये आनंद बक्षी यांनी त्या दोन ओळींना जोडून कम्प्लीट गाणे लिहून काढले!

रेकॉर्डिंगची जेव्हा वेळ आली तेव्हा किशोर कुमार यांना बोलावण्यात आलं. किशोर कुमार यांना ते रोमँटिक गाणे खूप आवडले ते म्हणाले, :आनंद बक्षी या तुमच्या भावना तुमच्याच नाहीत. तर सर्व तरुणाईच्या आहेत. हे गाणं पुढची पन्नास वर्ष लोकं गुणगुणतील याची मी आत्ताच गॅरंटी देतो!”. पंचम यांनी त्यांना सॉफ्ट आवाजामध्ये हे गाणं गायला सांगितलं आणि एका टेकमध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं. गाण्याचे बोल होते ‘ऐसे ना मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा तुमको मै चुरा लुंगा तुमसे दिल में छुपा लुंगा…’. ‘डार्लिंग डार्लिंग’ हा चित्रपट लांबल्यामुळे त्याच्यातील कंटिन्युटीमध्ये खूप फरक आला. रिलीजच्या वेळेला खूप प्रॉब्लेम झाले. कसाबसा हा सिनेमा प्रदर्शित झाला पण फ्लॉप ठरला.
================================
हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
=================================
खरंतर देव आनंद आणि झीनत अमान ही त्या काळातली एक हिट पेअर होती. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. हे गाणं महाबळेश्वर जवळच्या एका किल्ल्यामध्ये चित्रीत केलं होतं. या गाण्यात खलनायक जीवन देखील दिसतो. देव आनंदचे लाडके हॉटेल आहे फ्रेंडरीक हॉटेल महाबळेश्वरलाच आहे. देवच्या अनेक गोड स्मृती या हॉटेल आणि महाबळेश्वर मध्ये निगडित आहेत. (Entertainment News Update)