Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

तमाशा म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर उलगडणार Zing चित्रपटातून
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत… विनोदी, हॉरर, हॉरर-कॉमेडी, बायोपिक्स, ऐतिहासिक अशा विविध पठडीतील चित्रपटांच्या गर्दीत ९०च्या दशकातील एक काळ तमाशापटांनी गाजवला होता… जसा काळ बदलत गेला तसं लावण्या या केवळ चित्रपटांमध्ये एका गाण्यापुरत्या मर्यादित राहिल्या.. मात्र, आता पुन्हा एकदा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सर्व नवोदित कलाकार असणार आहेत… तमाशातील लावणी कशी असावी याचे सुंदर वर्णन करणारा ‘झिंग’ चित्रपट लवकरच महाराष्ट्रात रिलीज होणार आहे…(Marathi movie 2025)
“तमाशा म्हणजे काय?, तर तमाशा हा विविध रंगांनी, ढंगांनी, रसांनी नटलेला असतो. तमाशा म्हणजे चरचरीत लावणी, ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार…!”हे शब्द कानावर पडले आणि प्रेक्षकांच्या भुवया आपोआप उंचावल्या. तमाशा म्हणजे नेमकं काय, याचं इतकं सुंदर वर्णन करणारा ‘झिंग’ चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे…(Entertainment News)

दरम्यान, या चित्रपटाच्या पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली होतीच, पण आता टिझरने त्या उत्सुकतेला नवा उंचीला नेवून ठेवलंय. “तमाशा म्हणजे काय?” या एका प्रश्नातून सुरू होणारा टिझर, प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फडा समोर नेऊन सोडतो. ढोलकी, मृदूंग, टाळ, तुणतुणं, वग आणि त्यातली हसवणारी, रडवणारी, थिरकवणारी मजा हे सगळं टिझरमधून जिवंत झालं आहे… तमाशाच्या या रंगतदार वर्णनातून गावातल्या उनाड, स्वप्नाळू किसनाची कथा पुढे सरकते. वडिलांचं अपूर्ण स्वप्न – तमाशाचा फड उभारण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा झगडतो, हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात सुरू आहे.(Bollywood News)
====================================
====================================
विशेष म्हणजे ‘झिंग’ मध्ये काम करणारे सर्व कलाकार नवोदित असूनही, त्यांच्या अभिनयाची झलक टिझरमध्ये प्रेक्षकांना भावणारी आहे. ‘ड्रीम लालटन प्रोडक्शन्स’ आणि ‘रेडब्रिक्स मोशन पिक्चर’ प्रस्तुत, दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित ‘झिंग’ हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाला पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून, लावणी किंग आशिष पाटीलने नृत्यदिग्दर्शन केले आहे… झिंग हा चित्रपट महाराष्ट्रभरात १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi