‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डॅनी आणि अमिताभ यांनी खूप वर्ष एकत्र काम केलं नाही कारण…
कधी कधी अगदी किरकोळ कारणावरून देखील दोन अभिनेते एकत्र काम करत नाहीत. किती वर्ष? तर चक्क १८ वर्ष! तसं म्हटलं तरी या दोघांमध्ये काहीच मतभेद नव्हते. काहीही थेट वादही नव्हता. पण या दोघांना एकत्र काम करण्याचा योग तब्बल अठरा वर्षानंतर आला. दरम्यानच्या काळात एका चित्रपटात हे दोघे एकत्र आले होते, पण या दोघांचं एकत्रित असं एकही दृश्य या चित्रपटात नव्हते. हे दोन अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन आणि डॅनी डेंझप्पा. ( Untold story of Amitabh and Danny Denzongpa)
खरंतर डॅनी आणि जया भादुरी हे पुण्याच्या एफटीआय मधील क्लासमेट्स. दोघांची चांगली मैत्री होती. किंबहुना एफ टी आय मध्ये असताना डॅनीच्या रूपावरून, बोलण्यावरून तिथले मित्र त्याची खूप थट्टा करायचे. चीनी, नेपाळी म्हणून त्याचा पाणउतारा करून नाउमेद करणारे देखील काही कमी नव्हते. जया भादुरी मात्र कायम त्याची बाजू घेऊन त्याला सांभाळून घेत असे.
ईशान्येकडून आलेला हा कदाचित पहिला कलावंत होता. हिंदी भाषेसोबत त्याचा फारसा सलोखा नव्हता. त्याचे शब्द उच्चार देखील सदोष होते. या सर्व पार्श्वभूमीवर जया भादुरीने त्याला सांभाळून घेतले. त्याला उत्तम हिंदी शिकवले. त्याचे ‘टोलींग पेन्टसो डेंग्झोपा’ हे नाव बदलून सुटसुटीत असे ‘डॅनी’ केले. खरंतर डॅनीचा संपूर्ण ‘मेक ओव्हर’ जया भादुरीमुळे झाला. डॅनीदेखील तिच्या या उपकाराने कायम कृतज्ञ असतो. (Lesser Known story of Danny Denzongpa)
जया भादुरी आणि डॅनी यांनी १९७७ साली आलेल्या ‘अभी तो जी ले’ या चित्रपटात नायक नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटात ‘तू लाली हे सवेरे वाली’ हे गाणं खूप गाजलं होतं. पुण्याच्या एफटीआय मधून पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन रोशन तनेजा यांनी हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बनवण्याची प्रक्रिया खूप वर्ष चालल्यामुळे रेंगाळत रेंगाळत अखेर १९७७ प्रदर्शित झाला.
जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचे १९७३ साली लग्न झाले. अमिताभ बच्चनची ‘अँग्री यंग मॅन’ ची इमेज इथूनच सुरुवात झाली याच काळात सुरू झाली. आता येऊ या मूळ विषयाकडे. डॅनीची खलनायकाची इमेज जोरदार चालू झाली. धुंद, कालीचरण, खोटे सिक्के, काला सोना, द बर्निंग ट्रेन, लैला मजनू….. खरं तर शोलेच्या गब्बरच्या भूमिकेसाठी त्याचाही विचार झाला होता. पण त्या दरम्यान तो ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अफगाणीस्तानमध्ये होता.
अमिताभ आणि डॅनी यांना एकत्र आणण्याचा बराच प्रयत्न त्या काळात झाला. जया देखील या दोघांना एकत्र आणू इच्छीत होती. पण योग येत नव्हता. त्या काळात मनमोहन देसाई यांच्या चित्रपटात अमिताभ कायम असायचा. एकदा मनमोहन देसाई यांनी डॅनीला त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी विचारले. त्यावेळी डॅनीच्या तोंडून बाहेर पडलेल्या एका वाक्याने गहजब झाला. डॅनी मनमोहन देसाई यांना म्हणाला, “माफ करा. पण तुमचे सिनेमे अतार्किक असतात. भारतीय सिनेमाला ते दहा वर्षे मागे नेत असतात. बाकी निर्माते तुम्हाला फॉलो करतात आणि यात नुकसान भारतीय सिनेमाचे होते.” (Untold story of Danny Denzongpa)
=============
हे ही वाचा: जेव्हा अभिनेत्री रेखाचा ‘लीपलॉक किसिंग शॉट’ लाईफ मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला होता…
कोर्ट रूम ड्रामावर आधारित ‘हे’ ८ चित्रपट आवर्जून पाहायलाच हवेत
=============
डॅनीचे विधान कलावंत म्हणून जरी बरोबर असले तरी एक व्यावसायिक म्हणून विचार केला, तर चुकीचे होते. झाले… यातून मिडीयात उलट सुलट बातम्या येऊ लागल्या. याचबरोबर अमिताभ आणि डॅनी एकत्र येण्याचा मुहूर्तही लांबू लागला. १९८३ साली टी रामाराव यांचा ‘अंधा कानून’ हा चित्रपट आला होता. यात अमिताभ आणि डॅनी दोघे होते पण त्यांचा एकत्र एकही दृश्य चित्रपटात नव्हते. (या चित्रपटात प्राण याने अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा खलनायक रंगवला होता.)
१९८९ साली दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी ‘अग्निपथ’ या सिनेमाची जुळवाजुळव सुरु केली आणि या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ आणि डॅनी एकत्र आले. यात डॅनीने रंगवलेला ‘कांचा चीना ‘ जबरा होता. हे नाव त्यानेच दिग्दर्शक मुकुल आनंद यांना सुचविले होते. पुढे या दोघांनी हम, खुदा गवाह,अब तुम्हारे हवाले वतन साथीयो… अशा अनेक चित्रपटांतून सिनेमातून एकत्र भूमिका केल्या. पण त्यांना एकत्र काम करण्यासाठी तब्बल अठरा वर्षे वाट पहावी लागली.