Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गीता गोविंदमचा पार्ट 2 येणार का?

 गीता गोविंदमचा पार्ट 2 येणार का?
कलाकृती विशेष

गीता गोविंदमचा पार्ट 2 येणार का?

by सई बने 09/02/2023

गीता गोविंदम (Gita Govindam) हा चित्रपट 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. मुळात तेलुगु-भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम पेटला यांनी केले होते. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. एक हळुवार प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रष्मिका मंदाना यांचा अप्रतिम अभिनय आहे. शिवाय अत्यंत सुमधूर अशी गाणी. हा चित्रपट टॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलाच पण अन्य भाषांमध्येही आल्यावर तो हिटच होता. फारकाय ओटीटीवरही या चित्रपटाचे चांगलेच स्वागत झाले.  या  चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक परसुराम पेटला आणि विजय देवरकोंडा यांनी आपण एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. त्याबरोबरच गीता गोविंदमचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र विजयनं या चर्चेला विराम देत हा गीता गोविंदमचा (Gita Govindam) दुसरा भाग नसल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात विजय सोबत समंथा प्रभू ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. 

 विजय देवरकोंडा यांनी गीता गोविंदमचे (Gita Govindam) दिग्दर्शक परशुराम पेटला यांच्याबरोबर एक नवा चित्रपट साईन केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दिल राजू आणि शिरीष संयुक्तपणे हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेला विजय देवरकोंडा यांचा लायगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हिंदीमध्ये त्याची फारशी जादू चालली नाही. सुपरस्टार असलेल्या विजयच्या नावापुढे पहिल्यांदाच फ्लॉपचा शिक्का लागला. आता विजय पुन्हा एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शोधात होता. त्यात त्यानं खुशी या चित्रपटाची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.  विजयचा सुपरहिट ठरलेला चित्रपट गीता गोविंदमचे (Gita Govindam) दिग्दर्शक परशुराम पेटला यांच्याबरोबरच तो पुन्हा काम करत आहे. विजयचा परशुराम यांच्यासोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. विजय त्याचा लायगर चित्रपट फ्लॉप झाल्यावर निराश झाल्याचे सांगण्यात येत होते. या फ्लॉप नंतर त्यानं एक ब्रेक घेतला. हा काळ विजयनं त्याच्या कुटुंबासोबत घालवला. या निराशेतून बाहेर आल्यावर विजय नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हा खुशी नावाचा चित्रपट आहे. त्याचे शुटींग लवकरच सुरु होणार आहे.  

खुशी हा बिगबजेट चित्रपट आहे.  या चित्रपटाची घोषणा झाल्यावर गीता गोविंदमचा (Gita Govindam) सिक्वल आहे का? याची चर्चा सुरु झाली.  मात्र विजयनं हा सिक्वल नसल्याचे स्पष्ट केले आहे. या चित्रपटात विजयसोबत समंथा प्रभू दिसणार आहे. हा चित्रपट रोमँटिक ड्रामा आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. लायगर फ्लॉप झाल्यावरही विजयकडे अनेक चांगले चित्रपट आले होते. पण कोणताही चित्रपट स्विकारण्यापूर्वी त्याची कथा कशी आहे, हे जाणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रेक्षकांना माझे रोमॅंटिक चित्रपट आवडतात. त्यामुळेच खुशी हा चित्रपट स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. 

=====

हे देखील वाचा : सामंथाची 30 किलोची साडी आणि कोटींचे दागिने….

=====

2018 मध्ये आलेल्या विजय आणि रष्मिकाच्या गीता गोविंदमनं (Gita Govindam) बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड केला होता. 5 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं 132 कोटींची कमाई केली. समीक्षकांनीही या चित्रपटाचे परीकथा या वाक्यात कौतुक केले होते.  अत्यंत साधी सोप्पी प्रेमकथा असलेल्या या चित्रपटातील गाणीही तेवढीच लोकप्रिय ठरली. त्यातील “इंकेम इंकेम इंकेम कावाले” हे गाणे रिलीज झाल्यावर युट्यूबवर 1 दशलक्ष वेळा बघण्यात आले. हा एक रेकॉर्ड ठरला. ओटीटीवरही गीता गोविंदम (Gita Govindam) सर्वाधिक बघितला जाणारा चित्रपट ठरला. त्यामुळेच या चित्रपटाच्या सिक्वलची मागणी करण्यात येणार आहे. पण योग्य कथा तयार झाल्याशिवाय सिक्वलची घोषणा करण्यात येणार नसल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी स्पष्ट केले आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Gita Govindam Hollywood Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.