‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सिनेसृष्टीतला प्युअर एंटरटेनर
ज्याच्या सिनेमांच्या रिमेक वर अनेक अभिनेते दिग्दर्शक आपल्या तिजोऱ्या भरू पाहत आहेत, ज्याने एकेकाळी २ दिवस शूटिंग करून सिनेमे पूर्ण केले आहेत, असा एक मेहनती, टॅलेंटेड आणि भारतीय सिनेसृष्टीचा खरा एंटरटेनर म्हणतात अशा गोविंद अर्जुन अहुजा उर्फ आपल्या सगळ्यांचा लाडका गोविंदा याचा आज वाढदिवस. वडील अभिनेते आणि आई गायिका अभिनेत्री म्हंटल्यावर गोविंदा मध्ये सुद्धा हे गुण होतेच. तो आजही त्याची आई निर्मला देवी यांना खूप मानतो, त्याच्या बऱ्याच मुलाखतीतून त्याने बऱ्याचदा सांगितलं आहे की त्याची आई नसती तर तो इतका यशस्वी झालाच नसता, इतका मोठा स्टारचं हे स्टेटमेंट त्याच्यातला कृतज्ञ स्वभाव दर्शवते! आई आणि वडिलांच्या छत्रछायेत विरार सारख्या वस्तीत वाढलेल्या गोविंदा ला “चिची” या नावाने सुदधा लोकं ओळखतात.
वसईच्या वर्तक कॉलेजमधून बीकॉम ग्रॅज्युएट झाल्यावर गोविंदाच्या वडिलांनी त्याला फिल्म मध्ये येण्यासाठी सांगितलं! त्याच दरम्यान त्याने मिथुनदा यांचा डिस्को डान्सर हा सिनेमा पहिला होता आणि तो VHS वर सतत ती गाणी लावून त्यांच्या डान्स स्टेप्स बसवायचा प्रयत्न करत असे! १९८८ साली आलेल्या बी आर चोप्रा यांच्या महाभारत या सिरीयल साठी त्याने ऑडिशन सुदधा दिली होती पण स्वतःच्या काकांच्या सिनेमात प्रथम काम करायचे गोविंदाने ठरवले आणि तन बदन हा सिनेमा त्याने साइन केला, त्याआधी त्याने इलझाम आणि लव्ह ८६ अशा बऱ्यापैकी यशस्वी सिनेमातून काम केलं होतं, एकापाठोपाठ एक धडाधड सिनेमे करणाऱ्या गोविंदा ने एका वेळेस डेव्हिड धवन सोबत एक सिनेमा आजी त्याच दरम्यान रजनीकांत श्रीदेवी सोबत एक सिनेमे अशी कामं केली. गोविंदाने कधीच चोखंदळपणा दाखवला नाही, त्याला जे जे सिनेमे मिळत गेले ते तो करत गेला! राजेश खन्ना सोबतचा स्वर्ग आणि अमिताभ बच्चन यांच्या हम या सिनेमात गोविंदाच्या कामाची खूप तारीफ झाली. हळू हळू तो तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता!
नंतर डेव्हिड धवनच्या शोला और शबनम या सिनेमानंतर गोविंदा आज डेव्हिड धवन ही जोडी सुपरहिट ठरली, त्यापाठोपाठ आँखें सारखा सर्वात जास्त बिझनेस करणारा सिनेमा या जोडीने दिला. आणि मग या जोडीने मागे वळून पाहिलंच नाही. हिरो नं १, कुली नं १, बडे मियाँ छोटे मियाँ, राजा बाबू, दिवाना मस्तान, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, पासून ते अगदी पार्टनर र्यंत या जोडीने कमाल धमाल सिनेमे लोकांना दिले. मध्ये काही काळ ही जोडी वेगळी झाली खरी पण सलमानच्या आग्रहाखातर या दोघांनी पार्टनर या सिनेमात पुन्हा एकत्र काम केलं!
हे हि वाचा : जोधा अकबर- भव्यदिव्य प्रेमकथा साकारताना..
गोविंदा हा फेमस झाला तो त्याच्या अतरंगी डान्स स्टेप्समुळे, प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या त्याच्या गाण्यांमुळे आणि त्याच्या भन्नाट ड्रेसिंग स्टाईल मुळे. लाल पॅन्ट आणि पिवळा शर्ट घालून नाचायचं धाडस त्या काळात फक्त एकट्या गोविंदानेच केलं, आणि त्या वेळेस ते हिट सुद्धा झालं. त्याचा कॉमिक सेन्स जेवढा तगडा तितकाच त्याचा गंभीर अभिनय सुद्धा दांडगा आहे. स्वर्ग मधलं त्याचं काम बघताना ते प्रकर्षाने जाणवतं. गोविंदाची आणखीन एक खासियत म्हणजे तो त्याच्या कॉमिक टायमिंग मध्ये सुद्धा बऱ्याच सिरीयस गोष्टी लीलया एक्स्प्रेस करायचा. जीस देश में गंगा रेहता है, क्यूँकी मैं झूट नहीं बोलता, एक और एक ग्यारा अशा कित्येक सिनेमातून गोविंदाच्या अभिनयातली व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतील.
अगदी त्याने सध्याच्या रणवीर सिंह आणि अली जफर बरोबर केलेला किल दिल सिनेमातला व्हिलन (भैयाजी) सुद्धा असाच वेगळा छटा दाखवणारा आहे. गोविंदाला साचेबद्ध करण्यात सर्वात मोठा वाटा प्रेक्षकांचा सुद्धा आहे. कारण लोकांना गोविंदा म्हणजे विनोद मजा मस्ती हेच समीकरण वाटत असे. आणि लोकांची मागणी पहिले असं मनोमन ठरवलेला गोविंदा सुद्धा तसेच सिनेमे करत गेला. किल दिल, भागम भाग, पार्टनर, हे सध्याचे त्याचे काही हटके सिनेमे सोडले तर गोविंदाला इतर कोणत्या वेगळ्या भूमिकांमध्ये लोकांनी पाहणं पसंत नाही केलं! ताल, देवदास, गदर एक प्रेम कथा आणि खुद्द स्पिलबर्गचा अवतार त्याने रिजेक्ट केला असं म्हंटलं जातं, त्यात तथ्य नेमकं किती ते केवळ गोविंदाच जाणे, पण खरंच या सिनेमात गोविंदाला तुम्ही इमॅजिन तरी करू शकता का?? पण तरीही गोविंदा कडून एक गोष्ट प्रत्येकाने शिकण्यासारखी आहे ती म्हणजे साधेपणा, इतका मोठा स्टार असून त्याने कधीच त्याच्या स्टारडमचा माज प्रेक्षकांना नाही दाखवला कारण तो जणू होता जर प्रेक्षक आहेत तर आपण आहोत. अशा या भारतीय सिनेसृष्टीच्या एकमेव एंटरटेनरला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुझ्या या सेकंड इनिंग मध्ये तुझ्याकडून आणखीन वेगळं काहीतरी अनुभवायला मिळो, हॅपी बर्थडे चिचि!