विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार
साहित्य, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठी भाषिकांनी अवघ्या जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी भाषा सातासमुद्रा पार जात असतानाच आता एका नवीन उपक्रमाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. ते म्हणजे ‘M’TOWN STYLE AWARD- CELEBRATING FASHION’.
आजवर मराठीत कधीही न झालेल्या या उपक्रमात मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, स्पोर्ट्स, मीडिया अशा विविध विभागांमधील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. मराठी इंडस्ट्रीतही फॅशनला किती प्राधान्य आहे, तसेच मराठी इंडस्ट्रीतील फॅशन ही जगभरात पोहोचावी, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आजवर बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक पुरस्कार देण्यात आले असतील. परंतु विविध क्षेत्रांमधील फॅशनला गौरवणारा मराठीमधील हा पहिला पुरस्कार असेल. २०२१ मध्ये हा सोहळा आपल्या भेटीला येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याची सर्वेसर्वा प्रेरणा सुर्यवंशीने याविषयीची अधिक माहिती दिली आहे. ती सांगते की, मराठी इंडस्ट्रीत स्टाईल स्टेटमेंटमध्ये झालेला बदल निश्चितच उल्लेखनीय आहे आणि म्हणून या फॅशन, स्टाईलची दखल घेण्याच्या उद्देशाने मी ‘M’TOWN STYLE AWARD’चे आयोजन करत आहे. हा मुख्य उद्देश असला तरी महाराष्ट्रातील उभरते डिझायनर्स, स्टाईलिस्ट यांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळवून देण्याचाही माझा हेतू आहे.
हा पुरस्कार केवळ सिनेसृष्टीसाठी मर्यादित नसून टेलिव्हिजन, वेबसिरीज, थिएटर, डिजिटल मीडिया, स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येईल. मला असे वाटते, ‘M’TOWN STYLE AWARD’ हा मराठीतील पहिला पुरस्कार सोहळा असेल जो, केवळ फॅशन आणि स्टाईलला समर्पित करण्यात आला आहे.