‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट बनवताना दिग्दर्शक वैतागला ?
सिनेमाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे अंतर राखून वास्तववादी चित्रपट देण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच इथे होत होता. सत्तरच्या दशकापासून समांतर सिनेमाची एक वेगळी खेळी सुरू झाली. अनेक चित्रपट दिग्दर्शक कलात्मक सिनेमा बनवू लागले. सत्तरचे दशक आर्ट फिल्मचे सर्वाधिक यशस्वी दशक म्हणून ओळखले जाते. (Bollywood)
ऐंशीच्या दशकात मात्र थोडासा फरक जाणवू लागला. भारतामध्ये घराघरात टीव्हीच्या आगमन झाल्यानंतर लोकांची टेस्ट बदलली. बरेचसे आर्ट फिल्म वाले या नव्या माध्यमाकडे वळाले. तरी असे ऑफ बीट सिनेमे येताच होते. याच काळामध्ये एक चित्रपट आला होता जो ब्लॅक कॉमेडी प्रकारात गणला जातो आणि आज वरचा सर्वाधिक उत्कृष्ट असा पॉलीटीकल सटायर म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे नाव होतं ‘जाने भी दो यारो’. या सिनेमाच्या मेकिंग ची कहाणी खूप भन्नाट आहे. या सिनेमाचे बजेट खूप कमी होतं. हा चित्रपट एन एफ डी सी कडून बनवला गेला होता त्यामुळे लिमिटेड अर्थसहाय्य या सिनेमाला मिळाले. या सिनेमांमध्ये स्टार कास्ट जबरदस्त होती. सतीश शहा, ओम पुरी, रवी वासवानी, नसरुद्दीन शहा, भक्ती बर्वे…. हे कलाकार त्या काळात हौशी गटात मोडणारे होते ते स्टार झाले नव्हते. दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एका मुलाखतीमध्ये या सिनेमाच्या मेकिंगची भन्नाट कहानी सांगितली आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.(Bollywood)
आज हा सिनेमा पाहताना आपण मनमुराद हसतो पण हा सिनेमा बनवताना कुंदन शहा अक्षरशः रडकुंडीला आला होता. त्यांनी पुण्याच्या एफटीआय मधून शिक्षण घेतले होते. दिग्दर्शनात त्याला अधिक रस होता. कोणाच्या कडे असिस्टंट म्हणून काम करण्यापेक्षा त्याने सर्व हौशी मित्रांना एकत्र करून एक क्लस्टर बनवले त्याला नाव दिले सिनेमा कम्युन. आणि सर्वांनी मिळून हा चित्रपट बनवायचे ठरवले. सिनेमाचे बजेट कमी असल्याने सर्व कलाकार आपापले कपडे, मेक अप चे समान, डबे स्वत:च घेवून येत! बजेट मुळे वारंवार शूटिंग थांबत असे. पुन्हा पैसे हाती आले कि शूटिंग सुरु. पण सर्वांचा उत्साह आणि चिकाटी भारी होती. या सिनेमाची कथा स्वतः कुंदन शहा यांनीच लिहिली होती. परंतु या कथेवर स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहायला त्याला कोणी मिळत नव्हतं. कारण प्रत्येक जण त्याच्या कथेमध्ये लॉजिक शोधत होता आणि नकार देत होता. विनोद चोपडा यांनी त्याला दिल्लीच्या रंगभूमीच्या रणजीत कपूर (अभिनेता अन्नू कपूर यांचे बंधू) यांचे नाव सुचवले. कुंदन शहा थेट दिल्लीला जाऊन रणजीत कपूरला भेटले. रणजीत कपूर त्याला म्हणाले,” जर तुझ्या कथेमध्ये खरोखर दम असेल तरच मी या कथेवर स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहील!” (Bollywood)
कुंदन ने कथा सांगायला सुरुवात केली. अर्धी कथा झाली कीच रणजीत कपूर म्हणाला,” मी तुमच्या सिनेमा सोबत काम करायला तयार आहे!” कुंदन शहा खूष झाले. रणजीत कपूरने त्यांना विचारले “माझ्यासोबत आणखी एक कोरायटर घेतला तर तुम्हाला चालेल का?” तेव्हा कुंदन शहा म्हणाले,” माझी काही हरकत नाही पण बजेट कमी आहे.” रणजीत कपूर म्हणाले हरकत नाही माझ्यासोबत सतीश कौशिक डायलॉग लिहिल. कुंदन शहा गेल्यानंतर सतीश कौशिक म्हणाला,” मी आयुष्यात माझ्या नावाच्या व्यतिरिक्त आणखी काही लिहिलेलं नाही. तू माझे नाव कसे काय सजेस्ट केले?” त्यावर रणजीत कपूर म्हणाले,” मला तुझा कॉमेडी सेन्स माहिती आहे. तू माझ्यासोबत काम करतो आहेस” अशा पद्धतीने दोघे तयार झाले. मुंबईला रवाना झाले. दोघांनी महिनाभरामध्ये सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहिले.(Bollywood)
==========
हे देखील वाचा : संगीतकार मदनमोहन यांना ट्राफिक पोलीसांनी अडवले…
=========
आता प्रश्न फक्त क्लायमॅक्सचा होता. कारण एवढे सगळे कलाकार या एका सीन मध्ये कसे काय आणायचे हा प्रश्न होता. रणजीत कपूर यावर खूप विचार करत होते. ते अशी सिच्युएशन शोधात होते जिथे हे कलाकार क्लायमॅक्स ला एकत्र येतील. काही केल्या सुचत नव्हतं. एकदा मुंबईच्या सांताक्रूझ रेल्वे स्टेशन परिसरात भटकताना त्याला फुटपाथवर काही पुस्तके दिसली. त्यातील एक महाभारतावरील पुस्तक त्यांनी विकत घेतले पुस्तकाचे नाव ते महाभारत अवघ्या दीड रुपयांमध्ये ते पुस्तक त्याने विकत घेतले. पुस्तक वाचून त्याला आपल्या सिनेमाचा क्लायमॅक्स सुचला. सिनेमातील सर्व पात्र एका रंगमंचावर एकत्र येतात आणि तिथे चाललेल्या नाटकांमध्ये घुसतात अशा पद्धतीचा एक नॉन्सेन्स कॉमेडी चा नमुना होता. या क्लायमॅक्सच्या सीन मध्ये त्यांनी ‘महाभारत’ आणि ‘मुगल ए आजम’ या दोन्ही कथांची सर मिसळ करून रंगत वाढवली. अशा प्रकारचे पॉलिटिकल सटायर प्रेक्षकांनी यापूर्वी कधी बघितले नाही. प्रेक्षकांनी हा क्लायमॅक्स खूप एन्जॉय केली. या सिनेमाला प्रेक्षकांच्या सोबतच समीक्षकांनी देखील खूप गौरवले.