‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
यश चोप्रा यांचे नावडते संगीतकार अचानक आवडते झाले ?
दिग्दर्शक यश चोप्रा यांनी १९७३ सालच्या ‘दाग’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे आपली चित्र निर्मिती सुरू केली. यशराज फिल्म्स हे बॅनर त्यांनी निर्माण केले. त्यांचा पहिलाच चित्रपट ‘दाग’ २७ एप्रिल १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. गुलशन नंदा यांच्या कथानकावर आधारित या सिनेमाची गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. यानंतर यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आपल्या बॅनर कडून दुसरा चित्रपट निर्माण करायचे ठरवले ‘कभी कभी’.
या सिनेमासाठी देखील त्यांनी साहिर लुधियानवी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल हीच गीतकार – संगीतकार यांची जोडी कायम ठेवण्याचे ठरवले. परंतु त्याला विरोध गीतकार साहिर लुधियानवी यांनी केला. त्यावर दिग्दर्शक यश चोप्रा यांचे नावडते संगीतकार अचानक आवडते झाले ? नाराज झाले कारण खय्याम यांचे संगीत जरी चांगले असले तरी त्यांच्या चित्रपटांना यश मिळत नव्हते. खय्याम यांचे संगीत हिट होत होते पण त्यांचे चित्रपट फ्लॉप होत होते.
त्यामुळे यश चोप्रा (Yash Chopra) त्यांना आपल्याकडे संगीतकार म्हणून घ्यायला टाळत होते. परंतु साहीर यांचा आग्रह खय्याम यांच्याच नावाचा होता. खय्याम आणि साहीर हे दोघेही एकमेकांना लाहोरपासून ओळखत होते. पन्नास आणि साठच्या दशकात त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले होते. ‘फिर सुबह होगी’, शगुन’… जेव्हा यश चोप्रा यांनी साहीर यांना संगीतकार म्हणून खय्याम यांनाच का घ्यायचे हा प्रश्न केला त्यावेळेला साहीर लुधियानवी यांनी सांगितले,” आपण ‘कभी कभी’ हा चित्रपट माझ्या ‘तलखिया’ या काव्यसंग्रहातील एका कवितेवर बनवत आहोत.
ही कविता आहे ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है…’ खूप वर्षांपूर्वी चेतन आनंद ‘कभी कभी’ वर एक चित्रपट बनवणार होते. त्यावेळी या चित्रपटाला संगीत खय्याम देणार होते. आणि खय्याम यांनी ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ या रचनेला चाल लावली होती. परंतु काही कारणामुळे हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. परंतु ती धून खैयाम यांच्याकडे अजून आहे. मी चेतन आनंद यांना विनंती करून परत माझ्याकडे घेतली आहे. त्यामुळे जरी चेतन आनंद हा चित्रपट बनवत नसले तरी ‘कभी कभी’ या चित्रपटाला संगीत खय्याम यांचेच असेल.
जर खय्याम यांना संगीतकार म्हणून आपण घेणार नसाल तर मी माझी गाणी या चित्रपटासाठी देणार नाही तर मी देखील या सिनेमातून बाहेर पडेल !”. साहीर रोखठोक बोलणारे होते. साहीर यांचे समर्पक उत्तर ऐकल्यानंतर यश चोप्रा तयार झाले. खय्याम आणि साहीर या जोडीचा करिष्मा पुन्हा एकदा पब्लिकला प्रचंड आवडून गेला. खरं म्हणजे हा काळ मारधाडीचा होता. ‘शोले’ नंतरचा होता. संगीताला फारसं स्थान आता चित्रपटात उरलं नव्हतं. अशा काळामध्ये खय्याम यांनी एक संगीतप्रधान चित्रपट निर्माण करून यशस्वी करून दाखवला. यश चोप्रा (Yash Chopra) तर खय्याम यांच्यावर एवढे खुश झाले की, त्यांनी त्यांचे पुढचे त्रिशूल, नूरी, सवाल, नाखुदा हे सर्व चित्रपट खय्याम यांच्याकडेच संगीत नियोजनासाठी दिले !
============
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद यांनी घेतले !
============
कभी कभी या चित्रपटात तब्बल दहा गाणी होते. यातील टायटल सॉंग ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ प्रचंड लोकप्रिय ठरले. मै पल दो पल का शायर हूं पल दो पल मेरी कहानी है..’ हे मुकेश यांनी गायलेलं अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले गाणे आज देखील लोकप्रिय आहे. ‘तेरे चेहरे से नजर नही हटती नजारे हम क्या देखे’ आणि ‘तेरा फुलो जैसा रंग’ हे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेली दोन्ही गाणी यांच्या स्वरातील दोन्ही युगल गीते तरुणाईला बेहद आवडली होती. या चित्रपटाला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले त्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे संगीतकार खय्याम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा तर साहिर लुधियानवी यांना सर्वश्रेष्ठ गीतकाराचा पुरस्कार प्राप्त झाला !