
Anupamaa Serial: अभिनेता गौरव खन्ना ‘अनुपमा’ मालिका सोडणार? अभिनेत्याने स्वत: दिले उत्तर
‘अनुपमा‘ या लोकप्रिय मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने या मालिकेच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवला आहे. ‘अनुपमा’सोबतच गौरव खन्नाही दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. मात्र, या मालिकेतील अनुज कपाडियाचे ट्रैक काढून टाकण्यात येत असल्याची चर्चा होती. अशातच गौरव खन्ना शो सोडणार असल्याच्या अफवाही समोर आल्या होत्या. पण आता गौरव खन्ना याने स्वतःच या सर्व बातम्यांवर मौन सोडले आहे.(Gaurav Khanna Quit Anupamaa)

गौरव खन्ना यांने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ‘अनुपमा’ सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. गौरव खन्ना म्हणाला, ‘याची सुरुवात कधी आणि कुठून झाली हे मला माहित नाही. मी माझ्या शोसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याने मला यात काहीही तथ्य दिसत नाही. त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. या बातमीला कोणताही आधार नाही. गौरव खन्ना पुढे म्हणाला की, “सध्या इंटरनेटवर खूप फेक न्यूज सुरू आहेत. जेव्हा लोकांना एखादा शो आवडतो तेव्हा त्यांच्या स्वतःच्या कल्पना असतात हे मला समजते, परंतु या बातमीत काहीही तथ्य नाही. यासाठी आम्ही खूप काम करत आहोत. आमचे एपिसोड्स तीस मिनिटे, सात ही दिवस येतात. त्यामुळे आम्ही सर्व जण मेहनत घेत आहोत, असे ही तो म्हणाला.

‘अनुपमा‘ ही भारतीय टेलिव्हिजन मालिका जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांना आवडते. जेव्हापासून निर्मात्यांनी गौरव खन्नाला अनुज कपाडियाच्या भूमिकेत आणले आहे, तेव्हापासून या मालिकेला अधिक पसंती मिळू लागली आहे. गौरव खन्नाने रुपाली गांगुलीसोबत आपल्या हावभाव, डायलॉग डिलिव्हरी आणि जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या शोमध्ये आपण पाहत आहोत की, अनुज अमेरिकेत अनुपमा (रुपाली गांगुली) बद्दलच्या त्याच्या भावना कशा नव्याने अनूभवl आहे.(Gaurav Khanna Quit Anupamaa)
===========================
===========================
स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ ही मालिका गेल्या चार वर्षांपासून टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट-टीआरपी लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. रुपाली गांगुलीनंतर या शोमधून खूप लोकप्रियता मिळवणारी व्यक्ती म्हणजे गौरव खन्ना. अनुपमा जोशी आणि अनुज कपाडिया यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या मालिकेत अनेक प्रकारचे ट्विस्ट ही सुरू आहेत.