‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने कलाकारांना लावली ‘Vantiy Van’ची सवय
बॉलिवूडचा सुपरस्टार असो किंवा नवोदित अभिनेता/अभिनेत्री त्यांचे चित्रपटाच्या सेटवरचे नखरे, चोचले हे सगळ्यांनाच ठाऊक आहेत. या कलाकारांच्या मागे फिरणारा लवाजमा, त्यांचा तामझाम पाहून आपण सगळेच दंग असतो.
या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या दैनंदिन जीवनाचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे ‘व्हॅनिटी वॅन‘ (Vanity Van). आज अगदी छोट्यातल्या छोट्या अभिनेत्यापासून बड्या सुपरस्टार्स आणि अभिनेत्रींपर्यंत प्रत्येकासाठी सेटवर व्हॅनिटी वॅन मागवली जाते.
बडेबडे सुपरस्टार्स तर काही सेकंदाच्या जाहिराती शूट करतेवेळीही व्हॅनिटी वॅनची (Vanity Van) मागणी करतात.
हा ट्रेंड आता हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसू लागला आहे. मराठी कलाकारही त्यांच्या स्टेटसप्रमाणे व्हॅनिटी वॅन आपल्यासोबत ठेवतात. पण चित्रपटसृष्टीत व्हॅनिटी वॅन (Vanity Van) या प्रकाराचा शोध नेमका कुणी लावला ठाऊक आहे का?
आजच्या लेखातून आपण बॉलिवूड कलाकारांना व्हॅनिटी वॅनचा (Vanity Van) वापर करायला शिकवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल की भारतात व्हॅनिटी वॅनची (Vanity Van) सुरुवात ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लों हीने केली होती. आज पूनम ही चित्रपटसृष्टीत फार सक्रिय नसली तरी तिचा चार्म आजही आपल्याला बऱ्याच इव्हेंट तसेच अवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळतो.
आज पूनम ढिल्लों या एक प्रसिद्ध उद्योजिका आहेत आणि त्यांची स्वतःची व्हॅनिटी वॅनची (Vanity Van) कंपनी आहे. पूनम ढिल्लों या नेमक्या या व्यवसायात का व कधी आल्या याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.
१९७७ मध्ये केवळ १६ वर्षांची असताना पूनम या मिस इंडिया बनल्या आणि त्यांना यश चोप्रा यांच्या चित्रपटातून लॉंच केलं गेलं. हातात फारसे चित्रपट जारी नसले तरी त्यांचा चार्म अजूनही कायम आहे. १९७८ च्या गाजलेल्या ‘त्रिशूल‘ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
यानंतर ‘नुरी’, ‘काला पत्थर’, ‘सोनी महिवाल’, ‘कर्मा’सारख्या गाजलेल्या चित्रपटातही त्यांनी काम केलं. त्याकाळातील पूनम ढिल्लों या अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अशा अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या.
आपण चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करतोय ही गोष्ट पूनम यांच्या आईला अजिबात पसंत नव्हती. ही गोष्ट समजून घ्यायला त्यांना ५ वर्षं लागली होती. पण त्यांची आईने अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी काही अटी घातल्या.
आऊटडोर शूटसाठी पालकांना बरोबर घेऊन जायचं, मित्रांबरोबर पार्ट्या करायच्या नाहीत अशा काही अटी पूनम यांच्या आईने त्यांना घातल्या होत्या. त्याकाळी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीसमोर बरीच आव्हानं असायची. (Vanity Van)
त्यावेळी कलाकारांसाठी विशेष सुविधा नसल्याने त्यांना फ्रेश होण्यासाठी, आराम करण्यासाठी तिथेच सेटवर छत्रीखाली थांबावे लागत असे. बऱ्याचदा तर अभिनेत्रींना वॉशरूमसाठी किंवा कपडे बदलण्यासाठी झाडा-झुडपात जावं लागत असे. (Vanity Van)
माधुरी दीक्षित, जया बच्चन, श्रीदेवी यांसारख्या बड्याबड्या अभिनेत्रींनाही या समस्यांचा सामना करावा लागला होता.
===
हेदेखील वाचा : ‘या’ दिवशी येणार बहुचर्चित ‘पंचायत’चा तिसरा सीझन
===
त्याचदरम्यान पूनम ढिल्लों यांच्या डोक्यात ‘व्हॅनिटी वॅन’ (Vanity Van) ची संकल्पना घोळू लागली आणि त्यांनी एका बसचं रूपांतर व्हॅनिटी वॅनमध्ये करायचं ठरवलं.
एका बसमध्ये एसी रूम, मेकअप रूम, स्वच्छ टॉयलेट यांची सोय त्यांनी केली. परदेशात एका सिनेमाच्या शूटिंग निमित्त गेलेल्या पूनम ढिल्लों यांना तिथून परत आल्यावरच व्हॅनिटी वॅनची (Vanity Van) संकल्पना सुचली होती.
हॉलिवूडमध्ये तेव्हा याला ट्रेलर किंवा मेकअप वॅन म्हंटलं जात असे. पूनम ढिल्लों यांनी भारतात हाच प्रकार सुरू करत त्याचं ‘व्हॅनिटी वॅन’ (Vanity Van) असं नामकरण केलं.
व्हॅनिटी वॅन (Vanity Van) लॉंच करणाऱ्या पूनम ढिल्लों या भारतातील पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांच्याकडे स्वतःची वॅन होती.
१९९१ मध्ये ‘जे ट्रॅवलर्स’सोबत मिळून पूनम ढिल्लों यांनी भारतात तब्बल २५ व्हॅनिटी वॅन लॉंच केल्या. त्यावेळी इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना हा अवाजवी खर्च वाटत होता आणि त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण हळूहळू मात्र वेगवेगळे सेलिब्रिटीज व्हॅनिटी वॅन (Vanity Van) खरेदी करू लागले किंवा भाड्यावर घेऊ लागले.
सध्याच्या काळात तर छोट्यातल्या छोट्या प्रसिद्ध कलाकारापासून टॉपच्या सुपरस्टार्सपर्यंत सगळ्यांकडे व्हॅनिटी वॅन (Vanity Van) आहेत.
आज बरेच सेलिब्रिटीज पूनम ढिल्लों यांचे आभार मानतात कारण त्यांनी या व्हॅनिटी वॅनची संकल्पना बॉलिवूडमध्ये आणली.
पूनम या सध्या याच व्यवसायात आहेत. त्यांची Vanity नावाची एक मेकअप वॅन बनवणारी कंपनी आहे आणि भारतात व्हॅनिटी वॅन (Vanity Van) पुरवणारी ही एक मोठी कंपनी आहे.
मीडिया रीपोर्टनुसार पूनम ढिल्लों यांची एकूण संपत्ती ही तब्बल २२ कोटी रुपये इतकी आहे. अभिनयापेक्षा अधिक यश पूनम यांना व्हॅनिटी वॅनच्या (Vanity Van) व्यवसायात मिळाले हे जगजाहीर सत्य आहे.