Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

संकटात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या रहस्यमय ‘गूगल आई’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

 संकटात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या रहस्यमय ‘गूगल आई’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित
Google Aai Movie Teaser
मिक्स मसाला

संकटात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या रहस्यमय ‘गूगल आई’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 29/06/2024

हल्ली वेगवेगळ्या आणि अनोख्या विषयांवर सिनेमे येऊ लागले आहेत आणि प्रेक्षकांची अशा सिनेमांना पसंती मिळताना पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी असाच एका मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे या सिनेमाच्या नावाची ही खुप चर्चा रंगली होती. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई‘ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांनी केले असून डॉलर्स दिवाकर रेड्डी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अतिशय रोमांचक असा हा टिझर रहस्यांनी भरलेला आहे.(Google Aai Movie Teaser)

Google Aai Movie Teaser
Google Aai Movie Teaser

टिझरमध्ये एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून ‘गूगल आई’ या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. दरम्यान हा एक कौटुंबिक आणि रहस्यमय चित्रपट असून यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तंत्रज्ञानावर आधारित ‘गूगल आई’ हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Google Aai Movie Teaser
Google Aai Movie Teaser

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, ” एका लहान मुलीची ही कथा आहे जी संकटात अडकलेल्या आपल्या कुटुंबाला ‘गूगल आई’ कसे बाहेर काढते. आता हे कुटुंब कोणत्या कारणासाठी, कसे संकटात सापडले आहे आणि त्यांची सुटका कशी होणार, हे पाहाणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते किती उपयुक्त ठरेल, हेच या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”(Google Aai Movie Teaser)

============================

हे देखील वाचा: इतिहासातलं सुवर्णपान ‘भूपती’च्या रुपाने रुपेरी पडद्यावर येणार…

============================

काही दिवसांपूर्वीच ‘गूगल आई’ या चित्रपटाचे पोस्टर देखील लाँच करण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टरवर आई, मुलगी आणि बाप असे दाखवण्यात आले होते. तसेच त्याखाली गुगल सर्च इंजीन होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका लहान मुलीची ही गोष्ट आहे. एकंदरीत या चित्रपटात एक अनोखा विषय मांडण्यात येणार असल्याने टिजर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor pranav raorane Actress Prajakta gaikwad ashwini kulkarni actoress Entertainment madhab abhyankar Marathi Movie marathi movie 2024
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.