दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘गूगल आई’ मधील जावेद अली, सावनी रविंद्र यांच्या आवाजातील ‘मन रंगलंय’ प्रेमगीत प्रदर्शित
डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई‘ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच ही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा एक जबरदस्त टिझर ही नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. नावावरूनच हा चित्रपट तंत्रज्ञानावर भाष्य करणारा असला तरी हा एक कौटुंबिक चित्रपट असून नुकतेच ‘गूगल आई’मधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘मन रंगलंय‘ असे बोल असणाऱ्या या रोमँटिक गाण्याला जावेद अली आणि सावनी रवींद्र यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. या प्रेमगीताला एस सागर यांनी शब्दबद्ध केले असून संगीतही त्यांचेच लाभले आहे. प्रणव रावराणे आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे, तितकेच त्याचे चित्रीकरणही अतिशय बहारदार आहे.(Google Aai Movie Song)
प्रणव आणि प्राजक्ता यांच्यातील केमिस्ट्री यात खुलताना दिसत आहे. ओठांवर रेंगाळणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल, असे आहे. दरम्यान, तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका लहान मुलीची ही गोष्ट आहे. यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘गूगल आई’ या चित्रपटाची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा, लेखनाची धुरा सांभाळली आहे.
दिग्दर्शक गोविंद वराह गाण्याबद्दल म्हणतात , ” ‘मन रंगलंय‘ हे प्रेमगीत असून या गाण्याचे बोल, भावना खूपच सुंदर आहेत. या गाण्याचे सादरीकरणही अतिशय सुरेख आहे. खासियत म्हणजे जावेद अली आणि सावनी रवींद्र यांच्या आवाजाने या गाण्याला एक अनोखी उंची मिळाली आहे. मला आशा आहे, हे सुमधुर प्रेमगीत रसिकांच्या पसंतीस उतरेल.”
===============================
हे देखील वाचा: संकटात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणाऱ्या रहस्यमय ‘गूगल आई’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित
===============================
एक लहानगी आणि तिचे आईवडील असे सुखी कुटुंब दिसत आहे. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात काहीतरी घडते आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते. आता नेमके काय घडले आहे आणि यातून ‘गूगल आई’ या कुटुंबाला कसे बाहेर काढते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.