ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
आओगे जब तुम ओ साजना अंगना फूल खिले…
शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा २५ ऑक्टोबर २००७ रोजी प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा सिनेमा तरुणाई करीता आजदेखील ऑल टाईम हिट सिनेमा आहे. आज हा सिनेमा रिलीज होवून १७ वर्षे होत आहेत. मोस्ट लव्हेबल स्टोरी म्हणून ओळखला जाणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा म्हणजे कम्प्लीट इंटरटेनमेंट पॅकेज होता. याला संगीत प्रितम (Pritam) यांनी दिलं होतं. या चित्रपटातील गाणी इर्शाद कामिल यांनी लिहिली होती. यात सर्व प्रकारच्या ऑडियन्सला समोर लक्षात घेऊन गाणी लिहिलेली होती. यात सॅड सॉंग होते, लव्ह सॉंग होते , डान्स होता सर्व काही होते.
या चित्रपटात आणखी एक गाणं होतं जे अगदी हटके होत. हे गाणं काही प्रीतम (Pritam) यांनी संगीतबद्ध केलं नव्हतं आणि इर्शाद कामिल यांनी लिहिलेलं देखील नव्हतं हे गाणं होतं ‘आओगे जब ओ साजना अंगना फुल खिले…’ खरंतर हे गाणं १९९३ साली तयार झालं होतं. मग या गाण्याला चौदा वर्षाचा वनवास का घडला? हे गाणं चित्रपटात यायला मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Pritam)
या गाण्याचे संगीत संदेश शांडील्य यांनी दिले आहे. १९९३ साली त्यांना एक ट्यून सुचली त्यांनी त्यावर स्वतःच काही डमी वर्ड्स टाकून गाणं रेकॉर्ड करून ठेवलं. नदिया किनारे मोरा गाव… या टाईपचे काही वर्डस होते. त्यानंतर हि ट्यून त्यांनी अनेक निर्मात्यांना ऐकवली. बऱ्याच जणांना ट्यून आवडली पण ही ट्यून आपल्या चित्रपटाला चालेल का याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. कारण ही ट्यून पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील होती. अगदी हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये (बैजू बावरा, बसंत बहार, मुगल ए आजम) ज्या पद्धतीची गाणी असायची; त्या पद्धतीची हि ट्यून होती. आताच्या इंटरनेटच्या जमान्यातील यंग फास्ट जनरेशनला हे गाणं चालेल का असं प्रत्येकाला वाटायचं! असं करत करत तब्बल तेरा वर्षे गेली! (Pritam)
दरम्यानच्या काळामध्ये इम्तियाज अली यांनी २००५ साली ‘सोचा न था’ हा एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला संगीत संदेश शांडील्य यांचे होते. या चित्रपटाच्या दरम्यान कधीतरी संदेश यांनी इम्तियाज यांना ही धुन ऐकवली. त्यांना ती खूप आवडली आणि माझ्या पुढच्या सिनेमासाठी हे घेईन असं त्यांनी ठरवले. संदेशने फैझ अन्वर यांच्याकडून आता संपूर्ण गाणे लिहून घेतले. ‘जब वी मेट’ या चित्रपटात जेव्हा हे गाणं घ्यायचं ठरलं; त्यावेळी हे गाणं कुणाच्या आवाजात गाऊन घ्यावं हा प्रश्न निर्माण झाला. (Pritam)
संदेशच्या मनामध्ये पहिले पासून हे गाणं उस्ताद राशीद खान यांनी गाव असं वाटत होतं. त्याप्रमाणे इम्तियाज अली त्यांना अप्रोच झाले परंतु राशीद खान यांनी गाणं गायला नकार दिला. नंतर संगीतकार संदेश शांडील्य त्यांना भेटण्यासाठी थेट कलकत्त्याला गेले आणि त्यांना पुन्हा विनंती करून आले. उस्ताद राशीद खान खूप चिडले ते म्हणाले “मी एकदा सांगितलेलं नं मी तुमच्या चित्रपटात गाणार नाही म्हणून…” त्यावर संदेश शांडिल्य म्हणाले,” उस्ताद जी, तुम्ही मला नकार देऊ शकत नाही कारण मला तुमचं संगीत खूप आवडतं. मला तुमच्या आवाजातील कशिश खूप आवडते. त्या हक्काने मी तुम्हाला विनंती करत आहे. प्लीज. माझ्यासाठी गा.” आता मात्र उस्ताद राशीद खान यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी गाण्यासाठी होकार दिला. (Pritam)
===========
हे देखील वाचा : अमर सिंह चमकीलाने मोडलेला चक्क अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ रेकॉर्ड
===========
या गाण्याचे रेकॉर्डिंग कलकत्ता येथेच झाले. चित्रपटात हे गाणं खूप चांगल्या पद्धतीने चित्रित झाले. यातील बासरीचे पिसेस फार सुंदर बनले होते. जेष्ठ बासरीवादक नवीन कुमार यांनी यात बासरी वाजवली होती. या सिनेमातील सर्वच गाणी सुंदर बनली होती. तुमसे ही तुमसे ही (मोहीत चौहान) ये इश्क हाये बैठे बिठाये (श्रेया घोशाल), मौजा हि मौजा (मिका सिंग) नगाडा नगाडा (जावेद अली, सोनू निगम) आओ मिले चलो (उस्ताद सुलतान खान, शान) ‘जब वी मेट’ या चित्रपटाला यशस्वी करण्यामध्ये या गाण्यांचा मोठा वाटा होता! (Pritam)