Chhaava Box Office :’छावा’ची यशस्वी ओलांडला ३५० कोटींचा टप्पा

V. Shantara : सेहरा चित्रपटातील रफीच्या गाण्याचा बेहतरीन किस्सा!
साठच्या दशकामध्ये छत्रपती व्ही शांताराम (V. Shantaram) एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित करीत होते राजकमल चित्रमंदिर या बॅनरच्या खाली निर्माण होणाऱ्या या चित्रपटाचे नाव होते ‘सेहरा’. या चित्रपटात शांताराम बापूंची मुलगी राजश्री आणि प्रशांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी Hasrat Jaipuri यांनी लिहिली होती तर त्याला संगीत रामलाल यांचे होते. राजकमल बॅनर तर्फे आजवर जेवढे चित्रपट बनले होते त्यात रफीचा स्वर कधीच वापरला गेला नव्हता.

‘सेहरा’ पूर्वीच्या ‘नवरंग’ या चित्रपटामध्ये महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांचा स्वर वापरला होता. त्यापूर्वी मन्नाडे, हेमंत कुमार हे पुरुष स्वर प्रामुख्याने शांताराम बापूंच्या चित्रपटात वापरले जायचे. ‘सेहरा’ या चित्रपटात ‘तकदीर का फसाना जाकर किसे…’ हे गाणं हसरत जयपुरी यांनी लिहिलं होतं. या गाण्यासाठी शांताराम बापूंची आणि संगीतकार रामलाल यांची पहिली चॉईस महेंद्र कपूरच होती. पण रिहर्सलच्या वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की महेंद्र कपूरचा आवाज तर चांगला आहे, त्याची फेक देखील चांगली आहे पण या गाण्यांमध्ये जी दर्द भऱ्या भावना यायला पाहिजेत तेवढ्या प्रभावीपणे महेंद्र कपूर यांच्या स्वरात येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी वेगळा विचार करायचा सुरुवात केली. (V. Shantaram)
संगीतकार रामलाल यांनी या गाण्यासाठी मोहम्मद रफी यांचाच स्वर योग्य आहे असं सांगितलं. शांताराम बापूंना देखील ते पटलं. परंतु तोवर शांताराम बापूंनी कधीच आपल्या चित्रपटात मोहम्मद रफी यांचा स्वर वापरला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मनात शंका होती रफी आपल्या चित्रपटात गातील की नाही? हिंदी सिनेमांमध्ये विघ्न संतोषी मंडळी भरपूर असतात त्यामुळे रफी यांच्या मनात आपल्याविषयी कदाचित कुणी काही सांगितलं देखील असण्याची शक्यता आहे. अशी साधार भीती शांताराम बापू (V. Shantaram) यांना वाटत होती. रफी गातील की नाही ही शंका मनात होतीच. त्यामुळे बापू स्वतः मोहम्मद रफी यांना भेटण्यासाठी त्यांच्या रफी व्हिला या निवासस्थानी गेले. (Entertainment mix masala)

वॉचमनने जेव्हा रफिला शांताराम बापू तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत असा निरोप दिला तेव्हा रफी यांना खूप आनंद झाला आणि ते स्वतः बाहेर आले आणि आदरपूर्वक शांताराम बापूंना आत घेऊन गेले. शांताराम बापूंना हा एक सुखद धक्का होता तर रफीसारखा त्या काळातला सर्वोत्कृष्ट गायक स्वतः घराबाहेर घेऊन आदराने घरात घेऊन जातो याचा त्यांना खूप कौतुक वाटलं. रफी शांताराम बापूंना (V. Shantaram) म्हणाले, ”बापू तुम्ही स्वतः माझ्या घरी आलात हा मी माझा सन्मान समजतो तुम्ही भारतीय चित्रपट सृष्टीतील एक बुजुर्ग कलावंत आहात. आपण माझ्या घरी आलात हा माझा मोठा गौरव आहे.” शांताराम बापूच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले, ”आपल्या स्वर आजवर मी माझ्या चित्रपटात वापरू शकलो नाही परंतु आता सध्या मी जो चित्रपट करतो आहे त्यातील गाण्यासाठी मला तुमचा स्वर हवा आहे.” रफी यांनी आनंदाने कबूल केले.
===============
हे देखील वाचा : Sunny Deol : या अभिनेत्यांमध्ये तब्बल सोळा वर्षांचा अबोला होता.
===============
रफी यांनी हे देखील विचारले नाही की संगीतकार कोण आहे गीतकार कोण आहे आणि गाणं कोणावर चित्रित होणार आहे. नंतर संगीतकार रामलाल आणि रफी यांची भेट झाली आणि ‘तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये’ हे अजरामर गीत बनले. या गीतातील दर्द रफीच्या गहिऱ्या स्वरात आणखी भावूक बनला. याच चित्रपटात रफी आणि लताची दोन युगलगीते देखील होती. ‘तुम तो प्यार हो सजना..’ आणि ‘ जा जा जारे तुझे हम जान गये..’ शांताराम बापू आणि रफी यांचा संबंध फक्त याच चित्रपटांपुरता आला यानंतर हे दोघे महान कलाकार कधीच ऐकत आले नाही! (V. Shantaram)