Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Kiara Advani : कुणी तरी येणार गं; कियारा-सिद्धार्थ होणार आई-बाबा!
बॉलिवूडमधील क्यूट आणि हॅपी गो लकी कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. नुकतीच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे ज्याची सगळे जणं आतुरतेने वाट पाहात होते. लवकरच सिद्धार्थ-कियाराच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मिडीयावर दोघांनी ही आन्दाची बातमी फार युनिक पद्धतीने फोटो शेअर करत सांगितली आहे. (Kiara Advani)

किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दोघांनी हातांची ओंजळ केली असून त्या ओंजळीत इटुकले पिटुकले लोकरीनं विणलेले मोजे दिसत असून कॅप्शनमध्ये “The greatest gift of our lives👼 Coming soon…” असं लिहिलं आहे. (Bollywood update)
===========================
हे देखील वाचा : Kiara Advani Birthday: अभिनेत्री कियारा आडवाणीचं खरे नाव माहीतेय का? सलमान ने दिला होता नाव बदलण्याचा सल्ला
===========================
काही दिवसांपूर्वी कियारा एका कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि त्यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आता काळ्या रंगाचा ड्रेस आणि बॉलिवूडमध्ये प्रेगनेन्सी अनाऊन्स करण्याचा ट्रेण्ड जुना झाला आहे. पण त्या कार्यक्रमावेळी कियाराच्या चेहऱ्यावरील तेज पाहून नेटकऱ्यांनी किआरा गरदोर असल्याचा अंदाज बांधला होता. आणि अखेर ही गुडन्यूज त्यांनी देऊन सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी २०२३ राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. दोन वर्षांनी त्यांच्या घरी चिमुकला पाहूणा येणार असून आता सगळ्यांचीच उत्सुकता अधिक वाढली आहे. (Bollywood gossip)