MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Khakee: the Bengal Chapter चा ट्रेलर रिलीज, जाणून घ्या वेब सीरिज कधी आणि कुठे पाहता येईल?
Khakee: the Bengal Chapter या चित्रपटाद्वारे ओटीटीवर धुमाकूळ घालणारा नीरज पांडे आता त्याचा पुढचा भाग ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’ घेऊन येत आहे. या वेब सीरिजचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिरिजच्या ‘एक और रंग भी देखिया बंगाल का’ या गाण्याप्रमाणे अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये राज्यातील खून, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि पोलीस खात्याची न सांगितली जाणारी कहाणी दाखवण्यात आली आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ ही सिरिज भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी अमित लोढा आणि कुख्यात टोळीचा म्होरक्या यांच्यातील संघर्षाभोवती फिरतो. यामध्ये ऐश्वर्या सुष्मिता, जतिन सरना, रवी किशन, आशुतोष राणा, निकिता दत्ता, अनुप सोनी, श्रद्धा दास, नीरज कश्यप आणि भरत झा यांच्यासह ब्रिजेश्वर सिंह, अविनाश तिवारी, अभिमन्यू सिंह आणि करण तक्कर हे कलाकार आहेत.
============================
============================
नीरज पांडे दिग्दर्शित ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. ही मालिका २५ नोव्हेंबर २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती आणि आता प्रेक्षक ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात करण तक्कर, रवी किशन, अविनाश तिवारी, अभिमन्यू सिंह आणि आशुतोष राणा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी आता ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’चा ट्रेलर रिलीज केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या सिरिजची कथा २००० च्या दशकातील कोलकात्याची आहे. प्रचंड गुन्हेगारी, व्यवस्थेला पोकळ करणारा भ्रष्टाचार आणि कायद्याची अंमलबजावणी यांची रोमांचक कहाणी आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. ही मालिका शांतता आणि न्यायासाठी समर्पित एका आयपीएस अधिकाऱ्याच्या संघर्षावर आधारित आहे, विशेषत: कोलकात्यात कमकुवत न्यायव्यवस्थेचा बचाव एक पोलिस अधिकारी सत्ताधाऱ्यांविरोधात कसा करतो, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. या कथेत बंगालमधील तो काळ दाखवण्यात आला आहे जेव्हा गुंड आणि राजकारणी यांच्यातील वैर शिगेला पोहोचले होते. तेव्हाच आयपीएस अर्जुन मैत्रा यांनी व्यवस्थेला आव्हान देण्याचे धाडस केले.
============================
============================
नीरज पांडेची ही सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २० मार्च २०२५ रोजी रिलीज होणार आहे. एक्सवर मालिकेचा ट्रेलर शेअर करताना नेटफ्लिक्स इंडियाने ‘पोलीस, गँगस्टर आणि सरकार – या वेबमध्ये सर्वात धूर्त कोण आहे? पाहा खाकी : द बंगाल चॅप्टर २० मार्चला, फक्त नेटफ्लिक्सवर!’ असे कॅप्शन आहे.