Prasad Oak : “क्षेत्र कोणतंही असो…”; लेकासाठी मंजिरी ओकची खास

Hemant Dhome:“सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला ”,फडणवीसांकडे मागणी
कुटुंबाला घेऊन सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा म्हणजे खिशाला मोठी कात्री बसते. अशातच महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत मराठी चित्रपट (Marathi films) मराठी प्रेक्षकच पाहात नाहीत अशी तक्रार गेले अनेक वर्ष केली जात आहे. आता मराठी चित्रपट का पाहिला जात नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे; पण आपल्या भाषेतील चित्रपट मोठा व्हावा यासाठी प्रत्येक राज्याने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना देशभरातील प्रेक्षक प्रतिसाद देतात पण तो अधिक वाढावा यासाठी कर्नाटक सरकारने कोणताही चित्रपट केवळ २०० रुपयांत पाहता येणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय जाहिर केला आहे. यावरुन प्रसिद्ध अभिनेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक महत्वाची मागणी मराठी चित्रपटांसाठी केली आहे. (Hemant Dhome)
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्रातही मराठी चित्रपट सगळ्यांना पाहता यावा यासाठी सरकारने काही महत्वाची पावलं उचलावी अशी विनंती केली आहे. हेमंत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत थेट Devendra Fadnavis,अजित पवारांकडे एक महत्वाची मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय. कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत २०० रुपये इतकी मर्यादित असणार. आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक असं पाऊल ठरणार आहे”. (Marathi film industry)
===============================
हे देखील वाचा : Chhaava : बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची दहाड; ५०० कोटी पार करत रचला इतिहास
===============================
पुढे(Hemant Dhome) त्यांनी लिहिले आहे की,”अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आपल्या दोघांकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो आणि त्या नंतर मराठी भाषा आणि आपल्या भाषेतील चित्रपटांच्या भवितव्या करिता सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला आपण आळा घालाल हिच इच्छा! महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणं त्यांना प्राईम टाईम मिळणं यासाठी आता कायदा करण्यात यावा! महाराष्ट्रात मराठीलाच प्राघान्य हवं! शिवाय महाराष्ट्रात सगळ्याच चॅनल्स आणि OTT Platforms ची कार्यालयं आहेत, तर कर्नाटक सरकार सारखं आपणही त्या सर्वांना मराठीला प्राधान्य देणे अनिवार्य करावे ही विनंती!”

शेवटी त्यांनी, “मला खात्री आहे की आपलं सरकार मराठीसाठी, मराठी चित्रपट व्यवसायासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलेल”, असं लिहिलं असून सरकारकडे प्रेक्षक आणि चित्रपट मेकर्सही आशा लावून बसले आहेत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही मराठी चित्रपटांसाठी महत्वाचा निर्णय घेतला तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व मराठी चित्रपटांना हाऊसफुल्लचे बोर्ड लागतील.(Bollywood update)
हेमंत ढोमे यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ‘झिम्मा’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘सनी’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय, फकाट, ऑनलाईन-बिनलाईन, पोश्टर गर्ल या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे.